मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई सेशन कोर्टाकडून आज दिलासा मिळालेला नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे. एका मॉडेलने उद्योगपती राज कुंद्रा याच्या कंपनीतील चार निर्मात्यांविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचं देखील नाव आहे. पण गहनाने तिच्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे.
गहना हिने जामीन अर्जासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण तिला अद्याप अटकपूर्व जामीनसाठी कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे.
“माझं नाव चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं आहे. कोणत्याच पीडितेने माझं नाव घेतलेलं नाही. याचा अर्थ तोच होतो की मी या सर्व प्रकरणामध्ये नाही. मी राज कुंद्राच्या मोबाईल अॅपसाठी काही बोल्ड व्हिडीओज शूट केले हे मी मान्य करते. पण तो अॅडल्ट कंटेट नव्हता. याशिवाय त्यांना जेव्हा आर्टिस्टची गरज असते तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती देतात. त्यामध्ये किती मानधन देणार त्याबाबतही माहिती दिलेली असते”, अशी प्रतिक्रिया गहना वशिष्ठने दिली.
“माझ्यावर ज्या मॉडेलने आरोप केले आहेत तिने स्वत: अनेकदा अॅडल्ट व्हिडीओज शूट केले आहेत. याबाबतचे तिचे अनेक व्हिडीओ देखील इंटरनेटवर मिळतील. तर मी जबरदस्तीने कसं व्हिडीओ शूट करु शकते? सेटवर 50 लोक असतात. मी जर तसं काही केलं असेल तर त्याचा पुरावा द्या. मी एकटी आहे याचा अर्थ असा नाही की कुणीही येऊन माझ्यावर आरोप करु नये”, असं गहना म्हणाली.
गहनाने नुकतंच पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी अटक रोखण्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याचा आरोप तिने केला होता. गहना हिला याप्रकरणी याआधी देखील अटक झाली आहे. याप्रकरणी ती 4 महिने जेलमध्ये होती.
हेही वाचा : प्रसिद्ध मॉडेलचं शारीरिक शोषण ते 3 हजार कोटींचा घोटाळा, राम कदम यांचे राज कुंद्रावर गंभीर आरोप