CCTV : तिच्यावर गोळी झाडून स्वतःही ट्रकच्या चाकाखाली आला आणि…

प्रेम केलं तर मग तिलाच गोळ्या घालून त्याने ठार का मारलं? मयत मुलीची आई काय म्हणाली? समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजने सगळेच धास्तावले

CCTV : तिच्यावर गोळी झाडून स्वतःही ट्रकच्या चाकाखाली आला आणि...
धक्कादायक घटनाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 11:19 AM

मोहम्मद हुसेन खान, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये (Boisar Crime News) एक धक्कादायक घटना घडली होती. एका तरुणीवर तरुणानं दिवसाढवळ्या गोळीबार (Palghar Firing issue) केली. गोळीबारानंतर या तरुणानेही ट्रकच्या खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणावर उपचार सुरु होते. पण अखेर त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरलीय. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांचं काळजाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही (Shocking CCTV Video) आता समोर आलंय.

सध्या दोन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत. त्यापैकी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा स्नेहाला दिवसाढवळ्या गोळी झाडतो. स्नेहा जागच्या जागी कोसळते. त्यानंतर उलट्या काळजाचा आरोपी तरुण घटनास्थळावून निघून जातो.

तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दूरवर लावलेल्या एका कॅमेऱ्यात तरुण ट्रकखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसलाय. यावेळी ट्रकचं चाक त्याच्या अंगावरुन गेल्याचं दिसतं. यात अचानकपणे ट्रकसमोर उडी टाकल्यानं चालकालाही गाडी कंट्रोल करणं कठीण जातं. पण प्रयत्नांची शर्थ करुन तो गाडी थांबवतो. त्यामुळे मागचं चाक त्याच्या अंगावरुन जाता जाता राहतं.

हे सुद्धा वाचा

प्रेम प्रकरणातून ही खळबळजनक घटना घडली असल्याचा आरोप करण्यात आलाय. बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला होता. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो ही तरुणी जागीच ठार झाली होती. तरुणाने मागून येत तिच्या डोक्यावर बंदूक ताणून थेट गोळी झाडली होती. हा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

त्यानंतर गोळीबार केलेला आरोप कृष्णा यादव हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दरम्यान, कृष्णा याने सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीआयएसएफच्या गाडीचं पुढचं चाक त्याच्या शरीरावरुन धडधडत गेलं. गाडीचा वेग फारसा नव्हता, त्यामुळे मागचं चाकही शरीरावर जाण्याआधी गाडी थांबवण्यात आली होती.

तातडीने कृष्णा याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आरोपी कृष्णाचा उपचारादरम्यान, आता मृत्यू झालाय. बोईसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास केला जातोय.

या थरारक घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केलेत. आरोपी आणि मयत मुलगी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मयत मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न करण्यासाठी तरुणाला आग्रही केला होता. पण तरुण लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता, अशी माहिती मृत स्नेहाच्या आईने दिलीय.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.