Panvel : सुकापूर येथे स्लॅब कोसळून 12 वर्षांचा मुलगा ठार! नोटीस गांभीर्याने घेतली असती तर…

12 वर्षीय मुलाच्या मृत्यूने हळहळ! पनवेल मधील सुखापूर येथील कोणत्या सोसायटीत घडली दुर्घटना? वाचा सविस्तर

Panvel : सुकापूर येथे स्लॅब कोसळून 12 वर्षांचा मुलगा ठार! नोटीस गांभीर्याने घेतली असती तर...
पनवेलमधील दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 11:37 AM

नवी मुंबई : पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुकापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली. स्लॅब कोसळून एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील सगळेजण झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळला. यात दोघे जण जखमी झाले आहे. तर 12 वर्षांच्या मुलावर मात्र काळानं घातला घातलाय. सुकापूर येथील नवजीवन सोसायचीमध्ये ही दुर्घटना घडली.

सुकापूर येथे नवजीवन सोसायटी नावाची एक दुमजली इमारत आहे. या दुमजली इमारतीचा बहुतांश भाग जीर्ण झालाय. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांना आधीच नोटीस पाठवण्यात आली होती. पण तरिही नोटिसीकडे दुर्लक्ष करुन नागरीक जीव मुठीत धरुन याच ठिकाणी वास्तव्य करत होते.

सुकापूरमध्ये अनेक जीर्ण झालेल्या इमारती असून अशा इमारतींमध्ये राहणं जीवघेणं ठरु शकतं, हे या घटनेनं अधोरेखित केलंय. दरम्यान, नवजीन येथील सोसायटीचा दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि एकच खळबळ उडाली.

सदर इमारत ही दोन मजल्यांची होती. यात तीन कुटुंब राहत होती. स्लॅब कोसळत असल्याचं कळताच इतर सगळेजण बाहेर आले. पण 12 वर्षांचा चिमुरडा स्लॅबखाली दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, अशी अंदाज वर्तवला जातोय. या 12 वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

12 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची नोंद पोलिसांनी करुन घेतली असून आता पुढील तपास केला जातोय. या घटनेनं इतर जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी वेळीच दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.