AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bulli bai Case | आतापर्यंत तिघे ताब्यात, कसा लागला सुगावा? पोलिस आयुक्तांनी सांगितली मोड्स ऑपरेंडी

हा वादग्रस्त App एका मोठ्या कटाचा भाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे याप्रकरणी अधिक खोलवर चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणी पुढील शोध घेतंय.

Bulli bai Case | आतापर्यंत तिघे ताब्यात, कसा लागला सुगावा? पोलिस आयुक्तांनी सांगितली मोड्स ऑपरेंडी
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंच्या पत्रकार परिषदेतील फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 1:50 PM

मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत (Mumbai) घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी संवेदनशील प्रकरण असलेल्या एका वादग्रस्त Appविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली. या Appप्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून सायबर पोलीस (Cyber Police) याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, याप्रकरणी तपास करताना आरोपींची नेमकी मोड्स ओपरेंडी काय होती, हे देखील पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलय.

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

सोशल मीडियावरच्या (Social Media) काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर (Website) लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या App आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. 31 तारखेला हा App लोड करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. हा ऍप, तसंच ज्या ट्वीटर हॅन्डलवरुन या ऍपची माहिती दिली जात होती, त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली. तपास केला. त्यानंतर ‘बुल्ली बाई’ नावाचं ट्विटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं, हे देखील तपासात उघड झालं. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून याच नावानं ट्विटर हॅन्डलही सुरु करण्यात आलं होतं.

असा लागला सुगावा…

या ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्स कोण आहेत, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर मुंबई पोलीस लागले असता, त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. या वादग्रस्त Appप्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून दोघांना मुंबईतही आणण्यात आलं आहे. इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला एक विद्यार्थी या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याची देखील चौकशी केली जाते आहे. विशाल झा असं या संशयित आरोपीचं नाव असून एका तरुणीलाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. उत्तरा सिंह ही तरुणी या प्रकरणी संशियत आरोपी असून तिच्यासह आणखी एकाला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

हा वादग्रस्त App एका मोठ्या कटाचा भाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे याप्रकरणी अधिक खोलवर चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणी पुढील शोध घेतंय. या वादग्रस्त Appच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावतील असं कृत्य केलं गेल्यानं याप्रकरणातील दोषींविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला.

लोकांना कळकळीचं आवाहन

दरम्यान, अशा प्रकारच्या संवेदनशील घटना पुन्हा होऊ नये, यासाठीही सतर्कता बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज असल्याचंही हेमंत नगराळे यांनी म्हटलंय. लोकांनाही त्यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केलंय. वादग्रस्त Appप्रकरणी जे ट्विटर हॅन्डल या प्रकरणी ऑपरेट करत होतं, त्याचप्रमाणे काही इमेल पोलिसांच्या हाती लागले आहेत, त्याचा आता कसून तपास केला जातो आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना या वादग्रस्त Appबाबत अधिक माहिती द्यायची असेल, त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाशी संपर्क करावा, असंही आवाहन पोलीस आयुक्तांनी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलंय.

मूळ प्रकरण काय आहे?

बुल्लीबाई आणि सुल्ली डील या Appवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार समोर येताच संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सर्वच थरात कारवाईची मागणी होते आहे. मुस्लीम महिलांची बदनामी करण्यासाठी हा कट रचला गेल्याचा आरोप अनेकांनी केली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून कारवाईला वेग आला आहे.

इतर बातम्या –

Bulli Bai | दिल्ली पोलिसांनी दखल घेतली नाही, महाराष्ट्र पोलीस Bulli Bai प्रकरणाच्या तळाशी जाणार- नवाब मलिक

मुंबई पोलिसांकडून शिका, दिल्ली पोलिसांना ट्विटरवर सल्ला, #MumbaiPolice ट्रेडिंग, बुल्लीबाई केसचं काय आहे कनेक्शन?

पाहा पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.