Breaking News : कर्जबाजारीपणातून मुंबईत पोलीस हवालदाराची आत्महत्या
कांबळे यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र बॅंकेच्या कर्जाचा हफ्ता भरण्यात ते असमर्थ झाल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
मुंबई : कर्जबाजारीपणातून कांजूरमार्ग येथे एका पोलीस हवालदाराने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल गौतम साबळे असे आत्महत्या करणाऱ्या हवालदारा (Constable)चे नाव असून तो मूळचा करमाळा इथला राहणारा आहे. गौतम कांबळे यांनी बँकेतून कर्ज (Debt) घेतले होते. मात्र बॅंकेच्या कर्जाचा हफ्ता भरण्यात ते असमर्थ ठरले. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आणि आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांबळे यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कांबळे यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
बँकेचे कर्ज फेडता येत नसल्याने नैराश्येत होते कांबळे
पोलीस हवालदार निखिल गौतम साबळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी आहेत. कांबळे हे पोलीस हवालदार पदावर कांजूरमार्ग येथे कार्यरत होते. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर येथील इमारत क्र. पी 1 येथे ते वास्तव्याला होते. कांबळे यांनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे बँकांचे कर्जाचे हफ्ते ते फेडू शकत नव्हते. यामुळे ते नैराश्येत होते. याच विवंचनेतून शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच कांबळे यांच्या कुटुंबीयांना सोलापूरमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, कांबळे इतके कर्ज का घेतले होते याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. (Police constable commits suicide in Mumbai due to debt bondage)