High Court : कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही, मुंबई उच्च न्यायालयाने अंडा सेलमधून केली दोषीची सुटका

रुबीनाने वकील रुपेश जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कारागृह कायदा, 1894 नुसार कैद्यांना एकांतात ठेवण्याची वैधानिक अनुज्ञेय मुदत केवळ 14 दिवस असल्याचे निदर्शनास आणून दिले.

High Court : कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही, मुंबई उच्च न्यायालयाने अंडा सेलमधून केली दोषीची सुटका
कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:15 AM

मुंबई : दोन वर्षांहून अधिक काळ औरंगाबाद कारागृहात कथितपणे एकांतवासात ठेवण्यात आलेल्या इम्रान उर्फ मेहेदी नासिर शेख या आरोपीची मानसिक स्थिती तपासण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालया(Mumbai High Court)च्या औरंगाबाद खंडपीठाने तुरुंग प्रशासनातील अधिकार्‍यांना दिले आहेत. शेखची पत्नी रुबीना शेख हिने आपल्या पतीला सुमारे दोन वर्षे चार महिने अंडा सेल(Anda Cell)मध्ये (एकांत कारावास) ठेवण्यात आल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने अशा प्रकारे दोन वर्षांहून अधिक काळ कुठल्याही आरोपीला एकांतवासात ठेवण्याचा प्रकार फारच धक्कादायक असल्याचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. मुळात आरोपीला 14 दिवसांपेक्षा अधिक काळ अंडा सेल अर्थात एकांतवासात ठेवता येते. 1984 च्या महाराष्ट्र तुरुंग कायद्यात तशी तरतूद आहे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. (Prisoner cannot be kept in solitary confinement for more than 14 days, Mumbai High Court)

नेमके प्रकरण काय आहे?

रुबीनाने वकील रुपेश जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कारागृह कायदा, 1894 नुसार कैद्यांना एकांतात ठेवण्याची वैधानिक अनुज्ञेय मुदत केवळ 14 दिवस असल्याचे निदर्शनास आणून दिले. रुबीनाने सांगितले की तिने आणि तिच्या पतीने कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून विनंती केली होती की त्याला इतर कैद्यांसह नियमित सेलमध्ये स्थानांतरित करावे. तथापि, त्यांच्या अर्जांवर तुरुंग प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर रुबिनाने 5 जानेवारी 2022 रोजी औरंगाबाद खंडपीठाच्या कायदेशीर सहाय्य सेवांना पत्र लिहिले. यानंतर उच्च न्यायालयाच्या विधी सेवा उपसमितीने या खटल्यात रुबिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जयस्वाल यांची वकील म्हणून नियुक्ती केली आणि सध्याची याचिका दाखल करण्यात आली होती.

पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार

हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पेण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. बिरू गणेश महतो (19) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बोकारो झारखंड येथील रहिवासी आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलन मशिनवर मदतनीस म्हणून कामाला होता. येथे पोकलन मशिनवर चालक असलेला राजेंद्र यादव हा आरोपी बिरू महतो याला पोकलन मशिन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरुन काही ना काही कारण काढून त्रास देत होता. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी बिरू गणेश महतो याने राजेंद्र यादव याच्या दोन्ही हाताच्या पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

इतर बातम्या

‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली

‘लग्नाच्या जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात जुळतात!’ मुंबई उच्च न्यायालयानं असं नेमकं का म्हटलं?

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.