संतापजनक! नको तिथे हाथ लावून डिलीव्हरी बॉय पसार, ‘पुण्यातल्या किस’ नंतर पनवेलमध्ये ‘आक्षेपार्ह टच’

पुण्यात गेल्या आठवड्यात संतापजनक घटना उघडकीस आली होती, त्यानंतर आता पनवेलमध्येही खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय.

संतापजनक! नको तिथे हाथ लावून डिलीव्हरी बॉय पसार, 'पुण्यातल्या किस' नंतर पनवेलमध्ये 'आक्षेपार्ह टच'
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 11:58 AM

रवी खरात, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पनवेल : पुण्यात डिलीव्हरी बॉयने (Pune Delivery Boy) एका तरुणीचं जबरदस्ती चुंबन घेत विनयभंग केला होता. आठवड्याभरापूर्वीच ही घटना उघडकीस आलेली. ही घटना ताजी असतानाच आता पनवेलमध्येही (Panvel crime News) संतापजनक प्रकार घडलाय. एका डिलीव्हरी बॉयने केलेल्या कृत्यामुळे महिलांनी घरी एकटं असताना खाद्यपदार्थ पार्सल मागावावेत की नाही, असा सवाल उपस्थित होतोय. ‘पुण्यातल्या किस’नंतर आता पनवेलमध्ये (Panvel girl molested) ‘आक्षेपार्ह टच’ची घटना घडलीय.

नवी मुंबईला खेटूनच असणाऱ्या पनवेल इथं हा धक्कादायक प्रकार घडला. पनवेलमधील कोन गावाजवळ इंडियाबुल्स नावाची इमारत आहे. या इमारतीत ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केलाय. आरोपी डिलीव्हरी बॉयचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय.

नेमका घटनाक्रम काय?

पनवेलमध्ये फुड डिलीव्हरी बॉयने पार्सल दिल्यानंतर तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. त्यानंतर या तरुणाने तिथून पोबारा केला. पोलिस तक्रार झाल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

फुड डिलीव्हर करण्यासाठी एकजण इंडियाबुल्स इमारतीत आला होता. खाद्यपदार्थ घरपोच केल्यानंतर आरोपीने तरुणीकडून रक्कम स्वीकारली. यावेळी तरुणीच्या घरात कुणीही नव्हतं. याचा गैरफायदा तरुणानं उचलला आणि नको तिथं तरुणीच्या शरीराला स्पर्श केला. तरुणीने हटकल्यानंतर डिलीव्हरी बॉयने अखेर पळ काढला.

पीडित तरुणीने तातडीने पोलीस स्थानक गाठलं आणि याप्रकरणी तक्रार नोंदवली. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. डिलीव्हरी बॉयविरोधात वियनभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवलाय.

मोहम्मद रिजवान शेख असं डिलीव्हरी बॉयचं नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज, फोन नंबर आणि तरुणीच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून आता घेतला जातोय.

पुण्यानंतर पनवेलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे फुड डिलीव्हरी बॉयच्या विश्वासार्हतेवरच सवाल उपस्थित केले जातायत. घरात एकटं असताना तरुणींनी घरी पार्सल मागवणं कितपत सुरक्षित?, असा सवाल या दोन घटनांमुळे उपस्थित झालाय.

पुण्यात काय घडलं होतं?

पुण्यात झोमॅटो ऍपच्या डिलीव्हरी बॉयने एका तरुणीचं जबरदस्ती चुंबन घेतलं होतं. फुड डिलीव्हरीसाठी आलेल्यानं केलेल्या या कृत्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. 19 वर्षीय पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर 40 वर्षीय आरोपी रईस शेखच्या पोलिसांनी मुसक्याही आवळल्या होत्या.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.