Salman Khan Threat : धमकी प्रकरण, सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ? वाचा सविस्तर

सलमान खानला गँगस्टर गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्याबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर गोल्डी बरारला मी ओळखत नसून लॉरेन्स बीष्णोईला मागच्या एका प्रकरणामुळे तेवढंच ओळखतो, जेवढं लोक ओळखतात असं त्याने सांगितलं.

Salman Khan Threat : धमकी प्रकरण, सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ? वाचा सविस्तर
सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ?
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 8:57 PM

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला 5 जून रोजी जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. सलमानचे वडील सलीम खान यांना हे धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात सलमानचा सिद्धू मुसेवाला करु असे म्हटले होते. यानंतर सलीम खान यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी काल सलमान खानचा जबाब (Answer) नोंदवून घेतला आहे. यानंतर चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमान हैदराबादला रवाना झाला. सुत्रांच्या माहितीनुसार सलमान खानचा जबाब नोंदवताना त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले.

सलमान खानने जबाबात काय म्हटले ?

मागच्या काही दिवसात त्याला धमकीचा फोन किंवा काही मेसेज आले होते का ? अशी पोलिसांनी विचारणा केली. त्यावर सलमानने असं काहीही नसल्याचं सांगितलं. सलमानला हेही विचारण्यात आलं की, मागच्या काही दिवसात त्याचं कोणाशी भांडण किंवा काही वाद झालेत का ? तर त्याने त्यालाही नकारार्थी उत्तर दिलं. सलमानने पोलिसांना सांगितलं की त्याचं कोणाशीही भांडण किंवा वाद झाले नाहीत. हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवताना सलमानला कोणावर संशय आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर त्याने सांगितलं की. हे पत्र त्याला नाही तर त्याचे वडील मॉर्निंग वॉकला गेले असता तिथे त्यांना सापडलं आहे. सलीम खान नेहमी ज्या ठिकाणी बसतात, तेथे हे पत्र सापडलं आहे.

सलीम खान या ठिकाणी बसल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या एका विशेष जागेत त्याच्यासाठी असणाऱ्या जागेतून त्यांच्या नावे ठेवण्यात आलेली पत्र वाचतात. सलमान खान आणि त्यांच्या नावे अशी कित्येक फॅन्सची पत्र रोज तिथे असतात, जी सलीम खान वाचतात. याच पत्र ठेवण्याच्या जागेवर सलीम खान यांना धमकीचं पत्र आढळून आलंय. सलमान खानला गँगस्टर गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्याबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर गोल्डी बरारला मी ओळखत नसून लॉरेन्स बीष्णोईला मागच्या एका प्रकरणामुळे तेवढंच ओळखतो, जेवढं लोक ओळखतात असं त्याने सांगितलं. (Read the details of what Salman Khan said in the police reply regarding the threat case)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.