Badshah Malik | देशातील सर्वात मोठा रक्तचंदन तस्कर जाळ्यात, बादशाह मलिक मुंबईत जेरबंद
बादशहा मलिक हा भारतातील सर्वात मोठा रक्त चंदन तस्कर मानला जातो. त्याचे अंडरवर्ल्डसोबतही संबंध असल्याचं बोललं जातं. मलिकच्या रक्तचंदन तस्करीचं जाळं जगभरात पसरल्याची माहिती आहे. ईडीने बादशाहच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : देशभरात स्मगलिंगचे जाळे विणलेला रक्तचंदन तस्कर बादशहा मलिक (Badshah Malik) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बादशहाला मुंबईतील कुर्ला भागातून अटक केली आहे.
कोण आहे बादशहा मलिक
बादशहा मलिक हा भारतातील सर्वात मोठा रक्त चंदन तस्कर मानला जातो. त्याचे अंडरवर्ल्डसोबतही संबंध असल्याचं बोललं जातं. मलिकच्या रक्तचंदन तस्करीचं जाळं जगभरात पसरल्याची माहिती आहे. ईडीने बादशाहच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
घर-कार्यालयावर धाडी
ईडीने बादशहाला सोमवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पीएमएलए (Prevention of Money Laundering Act – PMLA) कायद्याखाली त्याला अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल बादशहा मलिकच्या कुर्ल्यातील घर आणि ऑफिसवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं होतं. सोमवारी रात्रभर चौकशी झाल्यानंतर पहाटे बादशहाला अटक करण्यात आली.
2015 मध्ये रक्त चंदन तस्करीचा गुन्हा
बादशाह मलिक याच्या विरोधात 2015 मध्ये रक्त चंदन तस्करीचा गुन्हा दाखल आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) हा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील एमिरेट्स शिपिंग एजन्सीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन हेगडे यांना न्हावा शेवामध्ये एक कंटेनर थांबवून अटक करण्यात आली होती 3 कोटी 20 लाख रुपये किमतीचं 7,800 मेट्रिक टन रक्त चंदन जप्त केल्यानंतर बादशाह मलिकला अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या :
पैशांच्या पावसाचा हव्यास, भाच्याने मावशीला घनदाट जंगलात जिवंत जाळलं, मृतदेह पुरला
आर्यन खानसंबंधी कथित खंडणी प्रकरणाच्या तपासाला पूजा ददलानीमुळे ब्रेक?