AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीला ‘हा’ शब्द उच्चारला; न्यायालयाकडून थेट जेलमध्ये रवानगी

या प्रकरणात सरकारी पक्षाने छेडछाड आणि लैंगिक छळवणुकीचा आरोप सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केला. त्या पुराव्यांवरुन न्यायालयाने रोडरोमिओला दीड वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.

अल्पवयीन मुलीला 'हा' शब्द उच्चारला; न्यायालयाकडून थेट जेलमध्ये रवानगी
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 24, 2022 | 4:35 PM
Share

मुंबई : रस्त्यावरून लहान मुलगी तरुणी किंवा महिला जात असेल तर रोड रोमिओ (Road Romeo) तिच्याकडे वाईट नजरेने पाहतात. अशा रोड रोमिओंना जरब बसवणारा निकाल मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने (Pocso Court) दिला आहे. रस्त्याने जात असलेल्या मुलीला उद्देशून वादग्रस्त शब्द बोलणाऱ्या रोड रोमिओला विशेष न्यायालयाने दीड वर्षांचा तुरुंगवास (Imprisonment) सुनावला आहे. रोड रोमिओना धडा शिकवण्याची नितांत गरज आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

लैंगिक चळवणुकीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला तुरुंगात पाठवताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदवली. लैंगिक छळवणुकीचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. पार्श्वभूमीवर रोड रोमिओंना आळा घालण्याची गरज आहे. कुणा मुलीला किंवा महिलेला उद्देशून आ* शब्द वापरणे यातून लैंगिक छळवणुकीचाच हेतू उघड होतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आरोपी वारंवार मुलीला छेडायचा

पीडित शाळकरी मुलीला तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलाने छेडले होते. मुलगी शाळेला येता जाताना तो तिला गाठत असे व तिला उद्देशून आ* शब्दाचा वापर करत असे. क्या आ* किधर जा रही हो असे तो तिला उद्देशून वारंवार बोलायचा.

पीडितेने एकदा त्या मुलाला रोखले, त्यावेळी त्याने त्या मुलीचे केस ओढले आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी मुलाच्या या अतिरेकानंतर पीडित मुलीने 2015 मध्ये पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली.

14 जुलै 2015 रोजी पश्चिम उपनगरातील एका लोकवस्तीत हा प्रकार घडला होता. घटना घडली त्यावेळी पीडित मुलीने पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र त्याआधीच आरोपीने तेथून पळ काढला होता.

आरोपीविरोधात विविध गुन्हे दाखल

मुलीने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्या आधारे वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भादवि कलम 354, 354 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात सरकारी पक्षाने छेडछाड आणि लैंगिक छळवणुकीचा आरोप सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केला. त्या पुराव्यांवरुन न्यायालयाने रोडरोमिओला दीड वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.