AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : IPL 2023 सुरु असताना सचिन तेंडुलकर पोहोचला पोलीस ठाण्यात

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरला पोलीस ठाण्यात तक्रार का नोंदवावी लागली? काय आहे हे प्रकरण? आयपीसीच्या कुठल्या कलमातंर्गत एफआयआर दाखल झालाय.

Sachin Tendulkar : IPL 2023 सुरु असताना सचिन तेंडुलकर पोहोचला पोलीस ठाण्यात
IPL 2023 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सांगितलं अर्जुनचं ते गुपित, त्याला सांगू नका असंही बजावलंImage Credit source: PTI
| Updated on: May 13, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई : क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. सचिन तेंडुलकरची प्रतिमा मलिन केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अज्ज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोदवलाय. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्याच प्रकरण आहे. औषधी उत्पादनांच्या प्रचारासाठी हे सर्व करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात अज्ज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

‘सचिनहेल्थ डॉट इन’ या वेबसाइटची माहिती देण्यात आली. सचिनचा थेट संबंध असावा, असं या वेबसाइटच नाव ठेवण्यात आलय. ही वेबसाइट सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा चुकीचा वापर करुन, या उत्पादनांचा प्रचार करत होती. सचिनच्या एका सहकाऱ्याने ही तक्रार नोंदवलीय.

सचिनने काय सांगितलं?

तक्रारदाराला सचिनच्या नावाचा वापर सुरु असलेली ही जाहीरात ऑनलाइन दिसली. सचिन तेंडुलकरने कधीच या कंपनीला आपलं नाव आणि फोटोंचा वापर करण्याची परवानगी दिली नव्हती. यामुळे सचिनची प्रतिमा मलिन होत होती. अनेक कलमातंर्गत गुन्हा

आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक), 465 आणि 500 मानहानी प्रकरणात अज्ज्ञात व्यक्तीविरोधात प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना झाला, त्यावेळी सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. सचिन मुंबई इंडियन्स टीमचा मेंटॉर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.