Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात, मात्र अद्याप झोनल डायरेक्टर या पदावर कायम

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा कार्यकाळ खूपच गाजला. मुंबईत सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण गाजत होतं. सुशांतला ड्रग्स दिलं जात होतं, असा आरोप होत होता. या परिस्थितीत समीर वानखेडे यांची केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली.

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात, मात्र अद्याप झोनल डायरेक्टर या पदावर कायम
समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:52 PM

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ आज संपत आहे. ना त्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे ना त्यांची बदली करण्यात आली आहे. यामुळे ते अजूनही झोनल डायरेक्टर या पदावर कायम आहेत. समीर वानखेडे यांच्या मुदतवाढीबाबत जानेवारी महिन्यात निर्णय होणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या कारवाईबाबत चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची बदली होणार नसल्याचं सूत्रांच म्हणणं आहे.

समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ गाजला

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा कार्यकाळ खूपच गाजला. मुंबईत सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण गाजत होतं. सुशांतला ड्रग्स दिलं जात होतं, असा आरोप होत होता. या परिस्थितीत समीर वानखेडे यांची केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. समीर वानखेडे यांची नेमणूक 30 ऑगस्ट 2020 रोजी झाली. सुरुवातीची ही नेमणूक सहा महिन्यांसाठी होती. समीर वानखेडे यांचं केंद्र हे DRI आहे. त्यांना एनसीबीमध्ये लोनच्या रुपात आणण्यात आलं होतं. त्यांची सुरुवातीला सहा महिन्यांसाठी नियुक्ती होती. या काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या केसेस हाताळल्यात. सुरुवातीलाच सुशांत सिंग प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांनी कारवाई सुरू केली. यावेळी रिया चक्रवर्तीसह सुमारे तीस जणांना अटक केली. भारती सिंग, दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश आदी अनेक फिल्मशी संबंधित व्यक्तींवर त्यांनी कारवाई केली.

मोठ्या कारवायांमुळे समीर वानखेडे अडचणीत

यानंतर त्यांना पुन्हा सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 30 ऑगस्ट 2021 पर्यंत होती. या कालावधीतही त्यांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर त्यांना पुन्हा तिसरी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 अशी होती. या कालावधीतही अनेक मोठ्या केसेस हाताळल्या. नवाब मलिक यांचे जावई समीर खान, शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान, अरमान कोहली आदि अनेक मोठ्या कारवाया केल्यात. मात्र याच कारवायांमुळे ते नंतर अडचणीत आलेत. समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच कारवाईची पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यांची चौकशी सुरू झाली. आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आल्याचा आरोप झाला होता. यामुळे मग समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत दोन विशेष पथक नेमण्यात आली आहेत.

मुदतवाढीचं पत्र जानेवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जारी करण्याची शक्यता

एक पथक आर्यन खान याला सोडण्यासाठी ज्याने पैसे मागण्यात आले होते त्याची चौकशी करण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं. तर दुसर पथक समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या पाच प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक नेमण्यात आलं होतं. या दोन्ही प्रकरणाची चौकशी वरिष्ठ आयपीएस अधिकारी करत आहेत. या दोन्ही चौकशी अजून पूर्ण झालेल्या नाहीत. त्यातच समीर वानखेडे यांची मुदत संपत आली. चौकशा पूर्ण व्हायच्या आत वानखेडे यांची बदली करणं योग्य होणार नाही. त्यामुळे चौकशीवर परिणाम होऊ शकतो. वानखेडे यांनी केलेल्या कारवाया त्याचप्रमाणे सुरू असलेल्या चौकशा या सर्व पार्श्वभूमीवर वानखेडे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मुदतवाढीचं पत्र जानेवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जारी केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sameer Wankhede’s term ends today, still retains the post of Zonal Director)

इतर बातम्या

Police woman Suicided | पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Jalna Suicide | कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल, चार लेकरांसह आईची विहिरीत उडी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.