हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

Minor Girl Raped by Father in Kalyan : एका मुलीच्या जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता. पीडित मुलगी जवळपास अर्धा तास रडत होती. शेजारच्यांनी घरात जाऊन पाहिले आणि अखेर मुलीला विचारपूस केली. यावेळी मुलीने...

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 6:28 PM

कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl Rape in Kalyan by Father and Brother) तिच्या बापासह भावानंही बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हादरवणारी बाब म्हणजे गेले सहा महिने हा सगळा गैरप्रकार सुरु असून या मुलीच्या आईला देखील याबाबतची सगळी माहिती होती. मात्र आईनं याप्रकरणी मौन बाळगल्यानं आता आपण कुणाकडे जाऊन न्याय मागायचा, असा प्रश्न पीडित मुलीला पडला होता. मात्र अखेर ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून याप्रकरणी नराधम बापासह या अल्पवयीन मुलीच्या भावालाही हैवानी कृत्य केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police, Kalyan) ही कारवाई केली असून या घटनेमुळे संपूर्ण कल्याण हादरुन गेलं आहे. कल्याण पूर्व (Kalyan East) भागात राहणाऱ्या एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार सुरु होता. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

6 महिन्यांपासून गैरकृत्य

पीडित मुलीच्या बापानं आणि तिच्या भावानं गेल्या सहा महिन्यांपासून हैवानी कृत्य केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी मुलीनं आपल्या आईलाही सांगितलं होतं. सगळ्यात आधी मुलीच्या भावानं गैरकृत्य केलं होतं. त्यानंतर या मुलीनं आपल्या आईला आणि वडिलांना याबाबत तक्रार केली होती. मात्र भावावर वेळीच लगाम घालण्याऐवजी पीडित मुलीच्या बापानं आणि आईनं तर याकडे दुर्लक्ष केलंच. शिवाय बापानंही आपल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कसा आला प्रकार उघडकीस?

पीडित अल्पवयीन मुलीचे काही मित्र घरी आले होते. तेव्हा मुलीनं त्यांना चहा दिला होता. मित्रांना चहा दिल्याच्या रागातून पीडित मुलीच्या बापानं अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली. यानंतर मुलीच्या आक्रोश आणि तिच्या आरडा-ओरड केल्याचा आवाजानं सगळेच हादरुन गेले होते. मुलीचा आकांत पाहून शेजारी जमा झाले. त्यानंतर संपूर्ण हकिकत मुलीनं सांगितली. पीडित मुलीनं सांगितलेला संपूर्ण थराराक प्रकार ऐकून सगळ्यांच हादरा बसला.

कल्याण पूर्व भागातील एका परिसरात एका घरातून एका मुलीच्या जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता. पीडित मुलगी जवळपास अर्धा तास रडत होती. शेजारच्यांनी घरात जाऊन पाहिले आणि अखेर मुलीला विचारपूस केली. यावेळी मुलीने सांगितले की, माझे काही मित्र घरी आले होते. त्यांना चहा पिण्यासाठी दिला. या कारणावरुन माझा वडिलांनी माझें प्रचंड हाल केले. मला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. मात्र या मुलीने आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं तेव्हा लोक हैराण झाले.

अल्पवयीन मुलीचा बाप आणि तिचा भाऊ या मुलीवर काही महिन्यापासून लैगिंक अत्याचार करत होते. सगळ्यात आधी भावाने बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब तिने तिच्या वडिलांना सांगितली तसेच तिच्या आईलाही सांगितली. आईला सांगून सुद्धा वडिलांनी आणि तिच्या भावाने तिच्यासोबत सुरु असलेले गैरकृत्य थांबवले नाही. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला सुद्धा सांगितला. मात्र पोलिसांना जाऊन सांगणार कोण? या भितीने कोणी पोलिस ठाण्यात जात नव्हते. आईसुद्धा काही बोलत नसल्याने ती मुलगी अत्याचार सहन करत राहिली.

सगळयात आधी तिच्या भावाने गैरकृत्य केलं. त्यानंतर वडिलांनीही तिच्यासोबत गैरकृत्य करायला सुरुवात केली. सध्या मुलीची आई काही कामानिमित्त गावाला आहे. हा प्रकार ऐकून शेजाऱ्यांनी पीडित मुलीला घेऊन हिंमत करत पोलिस ठाणं गाठले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी त्वरीत एक पथक नेमून या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या पथकाने या नराधम बापासह मुलाला अटक केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या

प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार

अपहरण झाले म्हणून वडिलांची पोलिसात धाव; लेक म्हणते त्रास देऊ नका ‘गॉट मॅरिड’

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.