Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Girl Death : मुंबईहून जम्मू-काश्मीरला निघालेल्या तरुणीचा धावत्या रेल्वेत गळफास, आत्महत्या की घातपात?; संशय बळावला

मयत तरुणी वॉशरुमला गेली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणी परत जागेवर आली नाही. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी वॉशरुम कोचचा दरवाजा उघडला असता सदर तरुणी गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

Mumbai Girl Death : मुंबईहून जम्मू-काश्मीरला निघालेल्या तरुणीचा धावत्या रेल्वेत गळफास, आत्महत्या की घातपात?; संशय बळावला
मुंबईहून जम्मू-काश्मीरला निघालेल्या तरुणीचा धावत्या रेल्वेत गळफासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 6:34 PM

मुंबई : मुंबईहून जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा येथे जात असलेल्या 20 वर्षीय तरुणीचा धावत्या रेल्वेत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह (Deadbody) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तरुणीसोबत एक व्यक्ती आणि एक लहान मुलगाही प्रवास करत होते. मात्र तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर हे दोघेही फरार (Absconding) झाले आहेत. वांद्रे टर्मिनस ते जम्मू काश्मीर श्री माता वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्प्रेसमध्ये रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटना उघडकीस आल्यानंतर डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्स्प्रेसला विशेष थांबा देण्यात आला आणि मृतदेह उतरवण्यात आला. मृतदेह डहाणू कॉटेज रुग्णालात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (Suspicious death of a young woman on a train traveling from Mumbai to Jammu and Kashmir)

वॉशरुम कोचमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

मयत तरुणी वॉशरुमला गेली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणी परत जागेवर आली नाही. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी वॉशरुम कोचचा दरवाजा उघडला असता सदर तरुणी गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळलेला होता. त्यानंतर डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्प्रेसला विशेष थांबा देऊन मृतदेह खाली उतरवण्यात आला.

हत्या की आत्महत्या ?

तरुणीसोबत बोरिवली स्थानकापासून एक लहान मुलगा आणि एक व्यक्ती सोबत प्रवास करत होते. तरुणीच्या मृत्यू बाब उघडकीस आल्यानंतर हे दोघेही फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या ? तरुणीसोबत असलेला व्यक्ती आणि लहान मुलगा कुठे गेले ? याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत. धावत्या रेल्वेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली आहे. (Suspicious death of a young woman on a train traveling from Mumbai to Jammu and Kashmir)

हे सुद्धा वाचा

'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.