Sachin Vaze : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जीवाला धोका, तळोजा जेल प्रशासनाची मुंबई सत्र न्यायालयात माहिती

सचिन वाझे यांनी कोर्टात केलेल्या अर्जाचे उत्तर देताना तळोजा जेल प्रशासनाने कोर्टासमोर असं सांगितलेला आहे की वाझे यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना कोर्टात हजर केला जात नाही.

Sachin Vaze : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जीवाला धोका, तळोजा जेल प्रशासनाची मुंबई सत्र न्यायालयात माहिती
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जेलमध्ये धिंगाणाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 5:21 PM

मुंबई : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze)च्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती तळोजा जेल प्रशासना (Taloja Jail Administration)ने आज मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. सचिन वाझेंनी मुंबई सत्र न्यायालया (Mumbai Session Court)त अर्ज करत आपल्याला सुनावणी दरम्यान कोर्टात आणला जात नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत त्यांना कोर्टात हजर केले जाते, असे म्हटले होते. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फतही हजर होत नाही. वाझे यांनी केलेल्या आरोप संदर्भात जेल प्रशासनाने वाजे यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या उत्तरात कोर्टाला सांगितले आहे. वाझे हे दोन महत्त्वाच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनले असल्याने त्यांना धोका असल्याचे जेल प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र वाझे यांना 18 ऑगस्ट रोजी सुनावणी दरम्यान कोर्टात आणला जाणार असल्याची माहिती मिळते.

ईडी आणि सीबीआय दोन्ही प्रकरणांमध्ये वाझे माफीचे साक्षीदार

कोर्टाच्या सुनावणी दरम्यान त्यांना कोर्टात उपस्थित राहण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र सचिन वाझे यांनी कोर्टात केलेल्या अर्जाचे उत्तर देताना तळोजा जेल प्रशासनाने कोर्टासमोर असं सांगितलेला आहे की वाझे यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना कोर्टात हजर केला जात नाही. सचिन वाझे हे पोलीस सेवेत असताना वादग्रस्त राहिलेले आहेत. अँटीलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे हे ईडी आणि सीबीआय या दोन्ही करत असलेल्या चौकशी प्रकरणांमध्ये माफीचे साक्षीदार बनले आहेत. त्या अनुषंगाने वाझे यांच्या जीवाला धोका असल्याची पोलीस प्रशासनाची माहिती आहे. (Taloja Jail administration informs Bombay Sessions Court that Sachin Wajes life is in danger)

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.