Birthday VIDEO | तोंडात शोभेचा पाऊस, पीठ टाकताच भडका उडाला, ठाण्यात विचित्र सेलिब्रेशनने बर्थडे बॉय होरपळला
व्हायरल झालेला व्हिडीओ अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये राहुल नावाच्या एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात आहे.
ठाणे : वाढदिवसाचं विचित्र सेलिब्रेशन बर्थडे बॉयच्या (Birthday Boy) चांगलंच अंगलट आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात (Ambernath Thane) एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी हातात शोभेचा पाऊस घेतल्यानंतर मित्रांनी त्याच्या डोक्यात पीठ टाकलं. त्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला. वाढदिवसाचं ओंगळवाणं सेलिब्रेशन बर्थडे बॉयला चांगलंच महागात पडलं, कारण भडका उडून तरुण होरपळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल झालेला व्हिडीओ अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये राहुल नावाच्या एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात आहे. यासाठी केकवर हल्ली वापरला जाणारा शोभेचा पाऊस लावण्यात आला.
पीठ टाकताच आगीचा भडका
असाच शोभेचा पाऊस पेटवून या तरुणाच्या तोंडात धरण्यासाठी देण्यात आला. यानंतर या तरुणावर अंडी फेकून मारण्यात आली. त्यामुळे तोंडातील जळत असलेला शोभेचा पाऊस या तरुणाने हातात पकडला. याच वेळी या तरुणाच्या अंगावर त्याच्या एका मित्राने पीठ टाकलं. आणि आगीचा मोठा भडका उडाला, ज्यात बर्थडे बॉय चांगलाच होरपळून निघाला.
या घटनेबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. राहुल नावाचा हा तरुण बुवापाडा परिसरात नेमका कुठे राहतो? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओनंतर हल्लीच्या तरुणांची वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत जीवावरही कशी बेतू शकते? हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
Birthday VIDEO | तोंडात शोभेचा पाऊस, पीठ टाकताच भडका उडाला, ठाण्यात विचित्र सेलिब्रेशनने बर्थडे बॉय होरपळला #Ambernath #Birthday pic.twitter.com/RJBvEU4MUn
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022
संबंधित बातम्या :
‘भाई का बड्डे’ गाण्यावर राडा, हवेत तलवार नाचवली; जळगावात बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला इंगा
देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना ‘तो’ गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ
‘बर्थडे बॉय’ला मित्रांकडून वाढदिवसाचं अतरंगी सरप्राईज, हा व्हीडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल