काम डिलीव्हरी बॉयचे, पैसे मिळाले की पळून जायचा, असा अडकला जाळ्यात

पैसे संपले की, दुसऱ्या डिलीव्हरी कंपनीत जाइन होत असे. काही डिलीव्हरी कंपन्यांना त्याने फसवले. अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.

काम डिलीव्हरी बॉयचे, पैसे मिळाले की पळून जायचा, असा अडकला जाळ्यात
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 10:19 PM

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई : एक डिलीव्हरी बॉय मोठा फ्रॉड निघाला. शैलेश असं त्याचं नाव. शैलेश डिलीव्हरी बॉय म्हणून काम करायचा. पैसे मिळाले की, तिथून फरार होत असते. सोबत पैसे घेत असे. थेट डॉन्स बार गाठत असे. डान्सरवर पैसे उधळत असे. पैसे संपले की, दुसऱ्या डिलीव्हरी कंपनीत जाइन होत असे. काही डिलीव्हरी कंपन्यांना त्याने फसवले. अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. आता त्याचा जेलची हवा खावी लागणार आहे.

डान्सबारमध्ये उधळायचा नोटा

मुंबईच्या MHB पोलिसांनी एका डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या एका चोरट्याला अटक केली आहे. फक्त डान्सबारमध्ये नोटा उडवण्यासाठी जास्त पैसे मिळताच पैसे तो घेऊन पळून जात होता. फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला 1 लाख 23 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

एक लाख २३ हजार रुपये घेऊन पसार

14 मे रोजी फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयात 1 लाख 23 हजार रुपयांचे 15 पार्सल डिलिव्हरी पेमेंट जमा न करता आरोपी पैसे घेऊन फरार झाला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंदे यांनी एक पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीला मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे.

अनेक डिलीव्हरी कंपन्यांची फसवणूक

शैलेश दिघास्कर असे आरोपीचे नाव आहे. तो दहिसर पूर्व रावळपाडा येथील रहिवासी आहे. याआधीही आरोपीने अनेक डिलिव्हरी कंपन्यांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आजतागायत तो कधीच पकडला गेला नाही.

शैलेशला डान्सबारचा शौक

चौकशीत आरोपी शैलेशने पोलिसांना सांगितले की, तो मुंबईत एकटाच राहतो. त्याला डान्सबारचा शौक आहे. पैसे चोरल्यानंतर डान्सबारमध्ये जाऊन डान्सरवर पैसे उडवत होता. नंतर एका ठिकाणाहून चोरी करून दुसऱ्या डिलिव्हरी कंपनीत काम करायचा.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...