Mumbai Drugs Seized : एनसबीची अंधेरी परिसरात कारवाई, कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून 50 लाखांचे चरस जप्त

कुरिअरच्या माध्यमातून चरस परदेशात पाठवले जाणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने सापळा रचला. तपासादरम्यान अंधेरी स्थित एका कुरिअर कंपनीत धाड टाकत पाहणी केली असता कंपनीच्या एका पार्सलमध्ये चरस आढळून आले.

Mumbai Drugs Seized : एनसबीची अंधेरी परिसरात कारवाई, कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून 50 लाखांचे चरस जप्त
एनसबीची अंधेरी परिसरात कारवाई, 50 लाखांचे चरस जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 5:57 PM

मुंबई : एनसीबी (NCB)ने अंधेरी परिसरात मोठी कारवाई करत 4 किलो 880 ग्रॅम चरस जप्त (Charas Seized) केले आहे. जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. हे चरस मुंबईहून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. मुंबईमध्ये ड्रग्ज माफियातर्फे सतत ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न सतत सुरू असतो आणि त्या अनुषंगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असो किंवा मुंबई पोलिसाचे अँटी नार्कोटिक्स सेल असो यांची कारवाई सुद्धा नेहमीच सुरूच असते. दरम्यान, अंधेरीतील ड्रग्ज प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे कुरिअर कंपनीवर एनसीबीची धाड

कुरिअरच्या माध्यमातून चरस परदेशात पाठवले जाणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने सापळा रचला. तपासादरम्यान अंधेरी स्थित एका कुरिअर कंपनीत धाड टाकत पाहणी केली असता कंपनीच्या एका पार्सलमध्ये चरस आढळून आले. जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर अमित घवाने यांनी दिली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे चरस जप्त केले आणि पुढील चौकशी दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे.

वॉटर प्युरिफायरमध्ये लपवून ठेवले होते चरस

हे चरस वॉटर प्युरिफायर म्हणजे पाणी शुद्ध करण्याची जी मशीन असते त्यामध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. या रॅकेटमध्ये ज्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हे ड्रग्ज ऑस्ट्रेलियात पाठविले जाणार होते, त्या कुरिअर कंपनीचा फ्रेंचायजी या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी आहे. एवढंच नव्हे तर ज्या एजंटनी हे पार्सल बुक केले होते, त्याने काहीही तपासणी न करता हे पार्सल बुक केला असल्याचा तपासात समोर आले आहे. (The NCB raided the couriers office in Andheri and seized 50 lakh charas)

हे सुद्धा वाचा

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.