Anil Parab : परवहनमंत्री अनिल परब यांची ईडीकडून 11 तास चौकशी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत विचारले असता परब यांनी बोलण्यास नकार दिला. मी पूर्ण दिवस या चौकशीत होतो. त्यामुळे मी शिंदे प्रकरणावर भाष्य करणार नाही. उद्या पुन्हा बोलावले आहे, त्यावर उद्या सकाळी कळेल, मी ठरवेन असे परब यांनी सांगितले.

Anil Parab : परवहनमंत्री अनिल परब यांची ईडीकडून 11 तास चौकशी
अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार? केद्राच्या पर्यावरण टीमकडून साई रिसॉर्टची पाहणी, नेमकं काय हाती लागलं?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:48 PM

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची आज तब्बल 11 तास ईडीकडून चौकशी (Inquiry) करण्यात आली. उद्या पुन्हा परब यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दापोलीचा रिसॉर्ट (Resort) माझा नाही. दापोलीच रिसॉर्ट माझं नाहीये, असं मी पहिल्यापासून सांगतोय. त्या साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केल आहे आणि तपास करतेय. रिसॉर्टमधलं पाणी समुद्रात जात म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. उद्या बोलावलं आहे की नाही अद्याप कळलं नाही, असे परब यांनी चौकशीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. यावेळी एकनाथ शिंदेंवर प्रतिक्रिया देण्यास परब यांनी नकार दिला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत विचारले असता परब यांनी बोलण्यास नकार दिला. मी पूर्ण दिवस या चौकशीत होतो. त्यामुळे मी शिंदे प्रकरणावर भाष्य करणार नाही. उद्या पुन्हा बोलावले आहे, त्यावर उद्या सकाळी कळेल, मी ठरवेन असे परब यांनी सांगितले. अनिल परब यांना 15 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र परब त्या दिवशी चौकशीला हजर राहिले नाहीत. नियोजित कामकाजामुळे मुंबईच्या बाहेर असल्याने आज चौकशीला गेले नसल्याचं त्यांच्याकडून कळवण्यात आलं होतं.

याआधी 26 मे रोजी करण्यात आली होती चौकशी

अनिल परब यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या नोंदणी आणि बांधकाम खर्चात गैरव्यवहार झाल्याचं ईडीच म्हणणं आहे. याच प्रकरणात ईडीने मे महिन्याच्या 26 तारखेला ईडीने परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि दापोलीतील 7 ठिकाणी छापेमारी केली होती. यात मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील दापोलीतल्या ठिकाणांचा समावेश होता. पुण्यातील व्यावसायिक विभास साठे, मुंबईतील अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम, सदानंद परब आणि आणखी काही लोकांवर ईडीने छापा टाकत सर्च ऑपरेशन केलं होतं. 26 मे रोजी परब यांच्या वांद्रे येथील मोणार्क इमारतीतील खाजगी घर त्याचबरोबर शासकीय निवस्थान अजिंक्यतारा येथेही ईडीने तब्बल 13 तास सर्च ऑपरेशन करत परब यांची चौकशी केली होती. (Transport Minister Anil Parab questioned by ED for 11 hours regarding sai resort)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.