शिक्षकच बनला भक्षक, शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य
पीडित मुलांनी याबाबत आपल्या आईला माहिती दिली. पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई / कृष्णा सोनारवाडकर (प्रतिनिधी) : घरी शिकवणीसाठी येणाऱ्या मौलानानेच दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी मौलानाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपी मौलानाला अटक केली आहे. शिक्षकानेच आपल्या विद्यार्थ्यांसोबत असे घृणास्पद कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अरबी आणि उर्दू शिकवणी घ्यायचा शिक्षक
पालकांनी पीडित मुलांना अरबी आणि उर्दू शिकवणी लावली होती. या शिकवणीसाठी सदर 25 वर्षीय शिक्षक 4 डिसेंबर 2022 पासून त्यांच्या घरी येत होता. शिकवणीदरम्यान दिवाणखाण्यात कुणी नसल्याचे पाहून आरोपीने 4 मुलगा आणि 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
पालकांच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल
पीडित मुलांनी याबाबत आपल्या आईला माहिती दिली. पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला अटक
आरोपी 4 डिसेंबर, 2022 पासून पीडित मुलांना अरबी आणि उर्दू भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. त्यावेळी दिवाणखान्यात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांसोबत अश्लील कृत्य करत होता. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला राहत्या परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली.