दोन वर्षापूर्वी श्रद्धाने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती तक्रार, मात्र पोलिसांकडून कारवाई नाही

श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास महिनाभराने तक्रार मागे घेतली होती. मात्र या महिनाभरात पोलिसांनी आफताबवर कोणतीही कारवाई केली नाही.

दोन वर्षापूर्वी श्रद्धाने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती तक्रार, मात्र पोलिसांकडून कारवाई नाही
दोन वर्षापूर्वी श्रद्धाने आफताबविरोधात दाखल केली होती तक्रारImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 3:48 PM

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताब श्रद्धाला मारहाण करत असल्याचे उघडकीस आले आहे. आफताब वारंवार गळा दाबून श्रद्धाला मारहाण करत असल्याची तक्रार 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2020 रोजी तिने तक्रार मागेही घेतली होती. नासासोपारा पूर्व येथील तुळिंज पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली होती.

पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास महिनाभराने तक्रार मागे घेतली होती. मात्र या महिनाभरात पोलिसांनी आफताबवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे तुळिंज पोलिसांनी कारवाई का केली नाही?, तिने केस मागे घेईपर्यंत वाट का बघितली? प्रश्न उपस्थित झाला आहे.

श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुलिंज पोलिसांनी टाळाटाळ केली असून, आम्ही ही माहिती दिल्ली पोलिसांना देणार असे सांगितले. मात्र त्याचवेळी आफताबवर कडक कारवाई झाली असती तर कदाचित एवढे मोठे हत्याकांड वाचले असते.

हे सुद्धा वाचा

श्रद्धाचा मारहाणीनंतरचा फोटो झाला होता व्हायरल

आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करीत असे. काल श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. मारहाणीमुळे श्रद्धाला तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले होते.

दिल्ली पोलिसांच्या पथकाकडून वसईत तपास सुरु

श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक वसईत शुक्रवारी दाखल झाले आहे. या पथक वसईतील माणिकपूर पोलिसांना सोबत घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहे.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर आणि आफताब-श्रद्धा ज्या घरात भाड्याने राहत होते, त्या घरमालकाचाही जबाब नोंदवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.