Video : 6 सेकंदात मंगळसूत्र हिसकावून पोबारा! उल्हासनगरमधील थरारक घटना, स्त्रियांमध्ये सोनसाखळी चोरांची प्रचंड दहशत
Ulhasnagar News : एके ठिकाणी या दोन्हीही व्यक्ती अचानक 3 सेकंदांसाठी गायब झालेल्या दिसतात. त्यानंतर पाठलाग करणारा हा व्यक्ती पुन्हा मागच्या दिशेने पळत जात असल्याचं दिसून आलंय.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) सोनसाखळी (Chain Snatchers) चोरांची दहशत पाहायला मिळतेय. सोनसाखळीच्या चोरीच्या घटनाही गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. दरम्यान, आता तर दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने हात साफ केलाय. रस्त्यावर कुणीच नाही, याचा गैरफायदा घेत या सोनसाखळी चोराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात टाकला. त्यानंतर हे मंगळसूत्र घेऊन या चोरट्याने पळ काढला. अवघ्या सहा सेकंदात ही चोरी करण्यात आली. ही थराक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही थरारक घटना उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील आहे. याप्रकरणी मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
थरारक सीसीटीव्ही समोर
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये रमा साळवे यांच्या मागून एक व्यक्ती जाताना दिसतो. एके ठिकाणी या दोन्हीही व्यक्ती अचानक 3 सेकंदांसाठी गायब झालेल्या दिसतात. त्यानंतर पाठलाग करणारा हा व्यक्ती पुन्हा मागच्या दिशेने पळत जात असल्याचं दिसून आलंय. या व्यक्तीच्या नावे आरडाओरडा झाल्यानंतरत मध्ये एक व्यक्तीला त्याला पकडण्याचाही प्रयत्न करतो. पण तो फोल ठरतो. महिला देखील या व्यक्तीचा मागे धावत जाते. पण तोपर्यंत गळ्यातून मंगळसूत्र खेचून या सोनसाखळी चोराने धूम ठोकलेली असते.
पाहा व्हिडीओ :
VIDEO : भररस्त्यात मंगळसूत्र खेचत फरार! उल्हासनगरमधील थरारक घटनेनं स्त्रियांमध्ये घबराट#chainsnatcher #Thane #Robbery
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/BP96Y8u4tu
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2022
उल्हासनगरच्या खेमानी परिसरात रमा साळवे राहतात. आज सकाळी त्या सीमा बिल्डिंग जवळून कामावर जाण्यासाठी रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी एका अज्ञात चोरट्याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचत पळ काढला. रमा यांनी या चोरट्याचा पाठलागही केला, मात्र चोरटा पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरातील महिलांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या सोनसाखळी चोरांना उल्हानसगरमध्ये सुळसुळाट पाहायला मिळत असून त्यांना कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागलीय.