Ulhasnagar Crime : रक्ताने माखलेल्या रिक्षावाल्याला रस्त्यावर फरफटत नेलं! उल्हासनगरमधील हल्ल्याचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात कैद

Ulhasnagar Crime : रिक्षात बसलेल्या व्यक्तीनेच रिक्षा चालकावर कटरने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने रिक्षावालाही बिथरला.

Ulhasnagar Crime : रक्ताने माखलेल्या रिक्षावाल्याला रस्त्यावर फरफटत नेलं! उल्हासनगरमधील हल्ल्याचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात कैद
जीवघेणा हल्ला...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:49 AM

उल्हासनगर : उल्हानगरमध्ये (Ulhasnagar Crime News) एका रिक्षावाल्यावर जीवघेणा हल्ला (Attempt to murder) करण्यात आला. ही धक्कादायक घटना प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीच. या हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. रक्ताने माखलेल्या या रिक्षावाल्याला (Ulhasnagar Rikshaw) रस्त्यावरुन फरफटत नेण्यात आलं. त्याआधी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वारही करण्यात आले होते. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात सदर रिक्षावाला गंभीर जखमी झाला होता. त्याचे कपडे रक्ताने पूर्णपण माखलेले होते. हल्लेखोराने अक्षरशः भररस्त्यात या रिक्षावाल्याला लोळवलं आणि त्यानंतर त्याला रस्त्यावरुन फरफटतही नेलं होतं. उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती.

कुणी केला हल्ला?

रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरच्या मोरया नगरी रोडवर रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आशेळेगाव गावदेवी मंदिराजवळ एक रिक्षाचालक रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी रिक्षात बसलेल्या व्यक्तीनेच रिक्षा चालकावर कटरने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने रिक्षावालाही बिथरला. यानंतर झालेल्या झटापटीमध्ये रिक्षा टेम्पोला जाऊन धडकली.

भररस्त्यात झटापट

यावेळी हल्लेखोराने रिक्षाचालकाला रिक्षाच्या बाहेर ओढलं आणि त्याला रस्त्यावर लोळवलं. रिक्षा चालकाला रस्त्यावर फरफटत नेल्यानंतर हल्लेखोर एका क्षणी निघून गेल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याच्या मधोमध जखमी रिक्षा चालक विव्हळत होता. यावेळी बघ्यांची गर्दीही झालेली होती.

हे सुद्धा वाचा

हल्ल्याचं कारण काय?

या हल्ल्यावेळी गोळा झालेल्या जमावाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीये. गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मध्यवर्ती रुग्णालयात या रिक्षा चालकाला भर्ती करण्यात आलंय. तसंच या हल्ल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची शंका घेतली जातेय. सध्या विठ्ठलवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.