Video : बघा, कशी चोरली जाते दुचाकी? इमारतीच्या पार्किंगमध्येही दुचाकी सुरक्षित नाही!
दुचाकी चोरुन पळाला, सीसीटीव्ही कैद झाला! उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट
उल्हासनगर : तुम्ही जर इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकीलावून निर्धास्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच! इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींचीही चोरी होऊ शकते. उल्हासनगरच्या (Ulhasnagar Crime News) एका इमारतीत अशीच एक घडना घडलीय. विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प 3मध्ये चोरीची ही घटना घडली. त्यामुळे परिसरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या चोरीप्रकरणी पोलिसांनी (Ulhasnagar Police) गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपासही सुरु केलाय.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील सेक्शन १७ परिसरात थायरासिंग दरबार आहे. या दरबारच्या जवळच असलेल्या शिल्पा अपार्टमेंटमध्ये कमल टेकचंद रवानी हे ६५ वर्षीय सेवानिवृत्त रहिवासी वास्तव्याला आहेत. त्यांनी सोमवारी रात्री त्यांची सुझुकी ऍक्सेस १२५ ही दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली होती.
उल्हासनगरमध्ये बाईक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #Ulhasnagar #Bike #Theft #WATCH pic.twitter.com/VQlHVT2UGQ
— Siddhesh Sawant (@ssidsawant) November 16, 2022
मात्र मंगळवारी सकाळी ही दुचाकी त्यांना तिथे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही चेक केलं असता त्यामध्ये एक इसम त्यांची दुचाकी पहाटेच्या सुमारास चोरून नेताना आढळून आला.
चोरी करणाऱ्या इसमाने ओळख लपवण्यासाठी जॅकेट आणि तोंडाला रुमाल बांधला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
उल्हासनगर शहरात दररोज अशाप्रकारे दुचाकी चोरीच्या घटना घडत असून त्यावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना मात्र अपयश येत आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आता पोलिसांकडून पुढील शोध घेतला जातोय. नेमक्या या बाईक चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना कधी यश येतं, हे पाहणं आता महत्त्वाचंय.