Vasai CCTV : बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा अखेर सापडला! माथेफिरु पतीला बोरीवलीतून अटक, बघा त्याने नेमकं केलं काय होतं?
हसन हा रंगकाम करायचा, असं पोलीस तपासातून समोर आलंय. मेहन्ही हसनच्या पत्नीने नूरीनिसा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत तिचे संबंध होते, त्याच्यासोबत ती राहायला जाण्याच्या उद्देशाने गेली होती.
मुंबई : बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा माथेफिरू पती अखेर सापडलाय. या माथेफिरु इसमाला बोरीवलीतून (Boriwali Police News) पोलिसांनी अटक केलं आहे. सोमवारी 37 वर्षीय इसमाने आपल्या पत्नीला वसई रेल्वे (Vasai CCTV Video) स्थानकात भरधाव वेगाने धडधडत येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनसमोर ढकलून दिलं. यात महिलेच्या ऑन द स्पॉट मृत्यू झाला. भिवंडी (Bhiwandi) राहणाऱ्या या इसमाने बायकोला ढकलून दिल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन प्लॅटफॉर्मवरुन पळ काढला होता. ही अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंध असण्याच्या कारणावरुन पतीने हे संतापजनक कृत्य केल्यानं एकच खळबळ उडाली होती. ही घटना समोर आल्यानंतर माथेफिरु पती फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. या भयंकर घटनेतील माथेफिरू पतीचं नाव मेहेन्दी हसन असं असून त्याच्या पत्नीचं नाव नूरीनिसा होत. नूरीनिसाचं वय 33 वर्ष होतं. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर माथेफिरु मेहन्दी हसनवर हत्येचं गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ :
Man caught on CCTV throwing his wife in front of speeding train and fleeing with 2 children at #Vasai station today morning. pic.twitter.com/yx0YU0ECKA
हे सुद्धा वाचा— Sandhya Nair (@sandhyanairTOI) August 22, 2022
हसन हा रंगकाम करायचा, असं पोलीस तपासातून समोर आलंय. मेहन्ही हसनच्या पत्नीने नूरीनिसा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत तिचे संबंध होते, त्याच्यासोबत ती राहायला जाण्याच्या उद्देशाने गेली होती. दरम्यान, यानंतर माथेफिरु पती आपल्या दोन मुलांना पतीपासून हिरावून पुन्हा आपल्या घरी घेऊन आला होता. या दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचं वय पाच वर्ष आहे, तर दुसरा अवघ्या 18 महिन्यांचा आहे.
तिला ढकलून देण्याआधी काय घडलं होतं?
तो रविवारचा दिवस होता. हसन आपल्या बायकोला सारखा फोन करत होता. तू परत ये, अशी सारखी तिला विनवणी करत होता. त्यावेळी तिने आपण वसई स्टेशन असल्याचं सांगितलं. यानंतर हसन वसईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर ही पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती जीआरपीचे अधिकारी संदीप भाजीबाकरे यांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्यामुळे माथेफिरु मेहन्दी हसन दिसून आल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास मदत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतरही सीसीटीव्ही फुटेज, त्याचे रेखाचित्र याच्या मदतीने पोलिसांनी आरोपी हसन यांचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्यात.