पोलीस उपनिरीक्षकांचे खोटे ओळखपत्र, वर्गमैत्रिणीसह अनेकांना गंडा, वसईत भामट्याला अटक

पोरस विराज जोखी असं भामट्याचं नाव असून तो वसईचा रहिवासी आहे. तो वसई विरार महापालिकेचा ठेकेदार असल्याची माहिती आहे. (Vasai Fake Police cheating case)

पोलीस उपनिरीक्षकांचे खोटे ओळखपत्र, वर्गमैत्रिणीसह अनेकांना गंडा, वसईत भामट्याला अटक
बनावट आयडीद्वारे फसवणूक
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 12:37 PM

वसई : पोलीस उपनिरीक्षकांचे खोटे ओळखपत्र बनवून अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला वसईत अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या वर्गमैत्रिणीलाच त्याने पोलीस असल्याचं सांगून लुटलं होतं. महिलेच्या तक्रारीनंतर वसईच्या माणिकपूर पोलिसांनी भामट्याला बेड्या ठोकल्या. (Vasai Fake Police arrested in cheating case)

पोरस विराज जोखी असं भामट्याचं नाव असून तो वसईचा रहिवासी आहे. तो वसई विरार महापालिकेचा ठेकेदार असल्याची माहिती आहे. मला मोठा ठेका मिळाला आहे, तुम्ही पैसे गुंतवा, असं सांगून ओळखीतील अनेक जणांना त्याने लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं होतं. गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करुन देण्याचं आमिष त्याने दाखवलं होतं.

पोलिसांचे बोगस आयकार्ड

गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी काही दिवसांनी जेव्हा पैसे मागितले, तेव्हा पोरसने पोलिसांचे बोगस आयकार्ड बनवले. खोटं आयडी दाखवून आणि मोठमोठ्या लोकांच्या ओळखी असल्याचं सांगून त्याने गुंतवणूकदारांना धमक्या द्यायला सुरुवात केली होती. पालघर पोलीस प्रशिक्षक यांच्या कार्यालयामार्फत त्याने पोलीस उपनिरीक्षकांचे एक बनावट ओळखपत्रही बनवले आहे. त्यात 2014 ची बॅच दाखवली आहे.

वर्गमैत्रिणीलाही पोलीस असल्याचं सांगून लुटलं

फसवलेल्या नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून शांत राहण्याची धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली. विशेष म्हणजे पोरस विराज जोखी याने स्वतःच्या वर्गमैत्रिणीलाही पोलीस असल्याचं सांगून लुटलं होतं. त्यांनंतर महिलेने माणिकपूर पोलिसांत तक्रार केल्याने या भामट्याचा भांडाफोड झाला.

बड्या उद्योजकांशी ओळख असल्याची बतावणी

आरोपी पोरस हा महानगर पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. या भामट्याने उद्योगपती रतन टाटा, स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यासोबत फोटो काढून त्याचाही गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बड्या लोकांसोबत आपले घनिष्ठ संबंध असल्याच्या वावड्या त्याने उठवल्या होत्या. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही, अशा थाटात तो फसवणूक करत होता. मात्र तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

अमित शाहांचा नातेवाईक असल्याची बतावणी, आमदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न फसला, भामटा ताब्यात

(Vasai Fake Police arrested in cheating case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.