Vasai Landslide : वसईत दरड कोसळून मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघ अडकले, एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Landslide Latest News : वसई (Vasai News) राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली.

Vasai Landslide : वसईत दरड कोसळून मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघ अडकले, एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु
वसईत दरड कोसळलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 11:07 AM

वसई : वसई (Vasai News) राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली (Land Slide)आहे. दरड खाली 4 जण अडकले. एका घरावर ही दरड कोसळली होती. यामध्ये चार पैकी दोघांना वाचवण्यात आलं असून एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही बचावकार्य सुरु आहे. आणखी एकाचा शोध सुरु आहे. स तर 2 जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक पोलीस, वसई विरार (Vasai Virar News) महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. टेकाळेजवळ एमएमआरडीएच्या पाईपलाईनचं काम करण्यात आलं होतं. त्यानंतर कोणतीही संरक्षण भिंत बांधण्यात आली नव्हती. सात वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही दरड कोसळली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली.

एकाचा मृत्यू

घरावर दरड कोसळून यामध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्य फसले. त्यातील 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तर दोघांचा शोध सुरु होता. यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे. अमित ठाकूर, रोशनी ठाकूर, वंदना ठाकूर, ओमकार ठाकूर हे दरडीत फसले गेले होते. त्यातील अमित ठाकूर यास बाहेर काढण्यात यश आलं. तर वंदना ठाकूर आणि ओमकार ठाकूर जखमी झाले होते, असं सांगण्यात आलंय. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

..तर दुर्घटना टळली असती!

मुसळधार पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर आहे. आज सकाळीही वसईत जोरदार पाऊस सुरु असून दरड कोसळण्याच्या घडनाही वाढल्यात. दरम्यान, एमएमआरडीकडून पाईपलाईन काम कऱण्यात आल्यानंतर संरक्षक भिंत बांधली गेली असतील, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असं स्थानिकांचं म्हणणंय.

वाहतुकीवर परिणाम

दरड कोसळल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. सकाळी सात वाजता दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाला आणि स्थानिक यंत्रणाना कळवण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण सहापैकी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर दोघे जण अजूनही दरडीखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

मुसळधार कायम

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पुढचे दिवस मुसळधार पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनाही काळजी घेण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.