कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या

वसईच्या मर्सेस गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पतीची प्रकृती बिघडल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं

कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या
वसईत विवाहितेची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 11:54 AM

वसई : सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या मर्सेस गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

स्मिताचे पती विवेक डिसिल्वा (वय 39) काही दिवसांपूर्वी परराज्यात जाऊन आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. याच वेळी सासू सासऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वांना वसईच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या उपचारा दरम्यान पतीची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे आता कसे होणार, या धास्तीने पत्नीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पत्नीने एक सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले असल्याचेही समोर आले आहे. वसई पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दरम्यान, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

काय घडलं होतं?

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर

(Vasai married lady commits suicide after family affected with COVID Health of husband deteriorates)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.