आई अभ्यासावरुन ओरडल्याचा राग, वसईत 12 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सोहम अभ्यास करत नाही या कारणावरुन 5 जुलै रोजी आई मुलाला रागावली. याच मनस्तापातून सोहमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले
वसई : शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत उघड झाली आहे. आईने अभ्यास कर असं सांगितल्याच्या रागातून 12 वर्षांच्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात गळफास घेऊन अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. (Vasai Minor Boy 12 years old school student commits suicide)
सोहम (बदललेले नाव) वसई पूर्व नवघर परिसरातील समर्थ रामदास नगर मध्ये कुटुंबासह राहत होता. सोहम अभ्यास करत नाही या कारणावरुन 5 जुलै रोजी आई मुलाला रागावली. याच मनस्तापातून सोहमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबादेत प्रियकराच्या आत्महत्येनंतर अल्पनवयीन प्रेयसीचा गळफास
ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय तरुणी औरंगाबादमधील गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जाटवडा रोड भागात राहत होती.
15 दिवसांपूर्वी प्रियकराची आत्महत्या
तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांनाही राजी केले होते. तीन महिन्यांपूर्वी दोघांचा विवाहही ठरवण्यात आला होता. मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने 15 दिवसांपूर्वी अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे तरुणीही दोन आठवड्यांपासून मानसिक तणावात असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या :
धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या
गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या
(Vasai Minor Boy 12 years old school student commits suicide)