12 वर्षीय आरोपी मुलाच्या वडिलांचा 7 वर्षीय पीडितेच्या पालकांवर हल्ला! कारण काय?

मुंबईच्या विक्रोळी भागातील धक्कादायक घटना! 7 वर्षांच्या मुलीसोबत 12 वर्षांच्या मुलाने काय केलं?

12 वर्षीय आरोपी मुलाच्या वडिलांचा 7 वर्षीय पीडितेच्या पालकांवर हल्ला! कारण काय?
धक्कादायक...
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 11:04 AM

मुंबई : 12 वर्षांच्या मुलाने 7 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात (Mumbai Crime News Today) तक्रारही देण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे आरोपी मुलाच्या (Dad of Minor Accused) पित्याने पीडित मुलीच्या आईवडिलांवरच हल्ला केल्याचं समोर आलंय. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्थानकात (Vikroli Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी मुलासह त्याच्या वडिलांवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी आता पुढील कारवाई केली जातेय.

विक्रोळीच्या चाळीत राहून एक कुटुंबीय रोजंदारीवर काम करुन आपला संसार चालवतं. या कुटुंबातील आईवडील जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग पालकांना सांगितला.

आपलं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पीडित 7 वर्षीय मुलीने केला. एका 12 वर्षांच्या मुलाने आपल्यासोबत हे कृत्य केल्याचं तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं.  संपातलेल्या आईवडिलांनी चाळीतच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचं घर गाठलं आणि त्याला जाब विचारला.

यावेळी आरोपी मुलाचे कुटुंबीय आणि मुलीचे कुटुंबीय यांच्या बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. आरोप करण्यात आलेल्या मुलाच्या वडिलांना पीडितेच्या पालकांवर हल्ला केला. यावेळी इतर शेजारी मध्ये पडले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस स्थानकात पोहोचलं.

विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. पण या मुलाच्या वडिलांना मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी केली जाते आहे.

विक्रोळी पोलीस स्थानकाच्या शुभदा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाचीही चौकशी केली जाईल. त्यासोबत मुलीचाही जबाब नोंदवून घेत योग्य तो तपास करुन पुढील कारवाई केली जाईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.