खुनाच्या बदल्यात खुन ! विक्रमसिंह चौहान यांना गोळ्या घातल्या, शिवसेनेचे सुदेश चौधरी यांच्यासह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल
कदम कुटुंबियांना निशांत कदमच्या खुनाचा बदला घ्यायचा होता, त्यामुळं त्यांनी समय मारण्याचा कट रचला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
विरार – विरारमध्ये (virar) झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात विरार पोलिसांना (virar police) यश आलं आहे, खुनाच्या बदल्यात खुन झालं असल्याचं पोलिस अधिका-यांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. झालेल्या गोळीबार प्रकरणात शिवसेनेचे सुदेश चौधरी (sudesh choudhari) सह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी दुपारी समय चौहान (samay chouhan) तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा काही तासातचं छडा लावला आहे. बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची सप्टेंबर 2021 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिवसा विरारमधील डीमार्ट जवळ त्याला गोळ्या घालण्यात आल्या. सुदेश चौधरी, निखिल कदम, सिद्धार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्यावरती विरार पोलीस ठाण्यात 302, 120 (ब), तसेच शस्त्र अधिनियम 3, 25, 27 प्रमाणे विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समयला चार गोळ्या घातल्या
विरार पुर्व डी मार्टच्या परिसरात समय चौहान आपल्या कारसोबत असल्याची बातमी आरोपींनाा लागली होती. त्यावेळी तिथं कोणी आहे की नाही हे पाहून आरोपी आपली मोटारसायकल घेऊन आले. घटनास्थळावर कोणीही नसल्याचे पाहून त्यांनी समयच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या घातल्या. त्यांनी मयत समयच्या अंगावर चार घातल्याने तो जाग्यावर कोसळला. आरोपीनी तिथून तात्काळ मोटारसायकलवरून पळ काढला. शिवसेनेचे सुदेश चौधरी, निशांत कदम, अनुराग पांडे यांचे विरार पूर्व फुलपाडा परिसरात बिल्डिंगच्या व्यवसायातून मागच्या 10 वर्षांपासून वाद चालू होता. हा वाद विकोपाला गेल्याने बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची सप्टेंबर 2021 हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर कदम कुटुंबियांनी विरार पोलिसांना माहिती सांगितली होती. परंतु त्यावेळी पोलिसांनी समयला अटक केली नव्हती. म्हणून कदम कुटुंबियांचा राग होता असं म्हणतात.
खुनाच्या बदल्यात खुन !
कदम कुटुंबियांना निशांत कदमच्या खुनाचा बदला घ्यायचा होता, त्यामुळं त्यांनी समय मारण्याचा कट रचला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करीत आहेत. त्यामुळे अजून काही गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल दुपारी हा प्रकार घडल्याने विरारमध्ये तणावपुर्ण वातावरण होते.