आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?
ष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अभिनेता सलमान खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधात एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अभिनेता सलमान खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधात एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण आर्यनला जी माणसं क्रूझवरुन घेऊन आली त्यापैकी काही जणांचा खरंतर एनसीबीसोबत काहीच संबंध नाही. ते भाजपचे पदाधिकारी आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.
विशेष म्हणजे एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये तो अतिशय चिंताक्रांत असल्याचे दिसतेय. मात्र, या सर्व प्रकरणामध्ये आर्यन आणि एका कथित एनसीबी अधिकाऱ्याच्या एक फोटोची विशेष चर्चा होत आहे. या फोटोमध्ये कथित एनसीबी अधिकाऱ्याने आर्यन खानसोबत सेल्फी घेतली होती. तोच कथित अधिकारी हा किरण गोसावी म्हणजेच के. पी. गोसावी असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित फोटोतील गोसावीशी आमचा संबंध नसल्याचं एनसीबीने स्पष्ट केल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. त्यामुळे गोसावी ही व्यक्ती नेमकी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच व्यक्ती संदर्भात समोर आलेली काही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
के. पी. गोसावी नेमका कोण?
व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी सवत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.
नवाब मलिकांकडून प्रश्नांची सरबत्ती
“काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.
“भाजपकडून बॉलिवूड-राज्य सरकारची बदनामी”
भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता, 21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
एनसीबीकडून दावा निकाली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) स्पष्टपणे सांगते की आर्यन खानसोबतच्या या फोटोतील व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही, असं ट्वीट एएनआयने केलं होतं.
Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi
— ANI (@ANI) October 3, 2021
हेही वाचा : कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट