जेव्हा बायको स्वतःच स्वतःचं कुंकू पुसण्यासाठी कट रचते! कुणासाठी आणि का? मुंबईतील शॉकिंग मर्डर मिस्ट्री

आझाद मैदान पोलिसांनी घटनेची नोंद करत सांताक्रुझ पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. यानंतर सांताक्रुझ पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात आले. गुन्हे शाखेने तपास सुरु करत रुग्णाचे सर्व वैद्यकीय अहवाल ताब्यात घेत तपासले.

जेव्हा बायको स्वतःच स्वतःचं कुंकू पुसण्यासाठी कट रचते! कुणासाठी आणि का? मुंबईतील शॉकिंग मर्डर मिस्ट्री
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 4:15 PM

मुंबई : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कविता शाह आणि हितेश जैन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी दररोज जेवणात थोडं थोडं विष घालून देत होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

कविता शाह आणि हितेश जैन यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात कविताचा पती कमल कांत शाह हा अडथळा ठरत होता. यासाठी दोघांनी कमल कांतचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी दोघांनी परफेक्ट प्लानिंग केले.

कविता दररोज पतीच्या जेवणात आर्सेनिक आणि थैलियम टाकून देत होती. हे दोन्ही केमिकल स्लो पॉयझनिंगचे काम करतात. यानंतर पतीची तब्येत बिघडली आणि त्याला 3 सप्टेंबर रोजी बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 17 दिवसांच्या उपचारानंतर कमल कांतचा मृ्त्यू झाला.

हे सुद्धा वाचा

अशी उघड झाली घटना

कमल कांतला उपचारासाठी रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या. यावेळी कमल कांतची हेवी मेटल टेस्टही करण्यात आली. टेस्टचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांना संशय आला.

रुग्णाच्या रक्तामध्ये आर्सेनिक आणि थैलियमची पातळी वाढली होती. कोणत्याही व्यक्तीच्या रक्तात या केमिकलची मात्रा वाढणे ही असामान्य बाब आहे. यामुळे डॉक्टरांनी आझाद मैदान पोलिसांना याची माहिती दिली.

आझाद मैदान पोलिसांनी घटनेची नोंद करत सांताक्रुझ पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. यानंतर सांताक्रुझ पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात आले. गुन्हे शाखेने तपास सुरु करत रुग्णाचे सर्व वैद्यकीय अहवाल ताब्यात घेत तपासले.

यानंतर गुन्हे शाखेने कमलकांतच्या कुटुंबीयांची चौकशी केली. कमलकांतच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबतही पत्नीकडे चौकशी केली. अधिक चौकशी केली असता पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली.

बऱ्याच काळापासून कविता जेवणातून पतीला आर्सेनिक आणि थैलियम देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी कविता आणि तिचा प्रियकर हितेशला अटक केली. दोघांनाही न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.