पती महिलांचे कपडे घालतो, अमानुष छळ करतो; पीडित महिलेची न्यायासाठी पोलिसांकडे धाव

पतीला महिलांचे कपडे घालण्याची सवय आहे. ही बाब लग्नापूर्वी लपवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत घाटकोपर येथील रहिवाशी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पती महिलांचे कपडे घालतो, अमानुष छळ करतो; पीडित महिलेची न्यायासाठी पोलिसांकडे धाव
अमानुष छळ करणाऱ्या पती आणि सासरच्यांविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात धावImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 6:44 PM

मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर परिसरात 20 वर्षीय महिलेचा अत्यंत भयंकर प्रकारे छळ करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदार महिलेने ज्या पुरुषासोबत विवाह केला, त्याची गलिच्छ सवय लग्नानंतर लक्षात आली. पतीला महिलांचे कपडे घालण्याची सवय आहे. ही बाब लग्नापूर्वी लपवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत घाटकोपर येथील रहिवाशी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचा पती कोल्हापूर येथील आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पतीची सवय लक्षात आल्यानंतर तिने सगळा प्रकार माहेरच्या लोकांच्या कानावर घातली. त्यानंतर कौटुंबिक पातळीवर वाद होऊ लागला.

याचदरम्यान तक्रारदार महिलेचा तिच्या सासरच्या मंडळींनी अत्यंत अमानुष पद्धतीने छळ सुरू केला. या प्रकरणी महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

पतीने महिलांचा पोशाख परिधान केला

महिलेचा आरोप आहे की, एकदा रात्री तिने पाहिले की तिच्या पतीने वधूचा पोशाख घातला आहे. लग्नाच्या वेळी तिने हे कपडे स्वतःसाठी आणले होते. इतकंच नाही तर नवऱ्याने मुलीसारखा मेकअप केला होता आणि रात्री असाच झोपला होता. दुसऱ्या दिवशी तिने याबाबत सासू-सासऱ्यांना माहिती दिली. तेव्हा सासू म्हणाली की, ही तिची जुनी सवय आहे.

हे सुद्धा वाचा

माहेरी सांगितल्यानंतर सासरच्यांकडून महिलेचा छळ

या घटनेनंतर तिने आपल्या घरच्यांना याबाबत सांगितले. माहेरी सांगितले म्हणून तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. सासरच्या लोकांनी आपल्या मुलाच्या कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी तिच्या गरोदरपणाची अफवा पसरवली. त्यानंतर तिच्या निष्काळजीपणामुळे तिचा गर्भपात झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत तिने पतीकडे तक्रार केली असता तिला मारहाण करण्यात आली.

याबाबत महिला कोल्हापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. मात्र पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. मुलीचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.