Mumbai Crime : शिफ्टिंगसाठी ऑनलाईन सर्व्हिस बुकिंग केली, मुव्हर्स ऑर्डर पॅकर्सचा स्टाफ बनून आले अन्…
आपण मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीतून सामान शिफ्ट करण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत चौघांनी महिलेच्या घरामध्ये घुसखोरी केली. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत घरातील सामानाचा ताबा त्यांच्याकडे दिला.
मुंबई : फसवणूक करणारा ठग आपल्या घरात कशी घुसखोरी करेल, याचा अंदाज लावता येणार नाही. मुंबईमध्ये एका गुन्ह्यात चक्रावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने तिच्या घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केली होती. तिच्या बुकिंगदरम्यानच एका ठगने मूव्हर्स अँड पॅकर्सचा स्टाफ बनवून महिलेच्या घरात घुसखोरी केली. या ठगने महिलेच्या घरातील टीव्ही, रोख रक्कम तसेच अन्य मौल्यवान ऐवज लंपास करून पळ काढला. या प्रकाराने आता ऑनलाइन बुकिंगदेखील सुरक्षित राहिली नसल्याचे उजेडात आले आहे. घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी तुम्हीदेखील मुव्हर्स अँड पॅकर्सची ऑनलाइन बुकिंग करत असाल तर सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे.
मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीतून आल्याचे सांगत लुटले
आपण मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीतून सामान शिफ्ट करण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत चौघांनी महिलेच्या घरामध्ये घुसखोरी केली. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत घरातील सामानाचा ताबा त्यांच्याकडे दिला.
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर चारही ठग लोकांनी घरातील मौल्यवान वस्तूंवर डोळा ठेवला. यावेळी घरातील महागडा टीव्ही तसेच अन्य मौल्यवान ऐवजासह अडीच हजार रुपयांची रोख रक्कम डंपास करण्यात यश मिळविले.
परळच्या भोईवाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. महिलेने तिच्या घरातील साहित्य वरळी येथील नवीन घरात शिफ्ट करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली होती.
डोंबिवली येथून एकाला अटक, तिघे फरार
फसवणूक झालेल्या महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पुढील तपासाची चक्री फिरवली. यादरम्यान आरोपींपैकी एकाला डोंबिवली येथून अटक करण्यात आली असून तिघे अद्याप फरार आहेत.
आरोपींविरोधात कलम भारतीय दंड विधान कलम 420 आणि कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विरोधात यापूर्वी देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे फसवणूक करणारी ही मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.