Google CEO Sundar Pichai: कालच पद्मभूषण मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारकडून कालच पद्मभूषण पुरस्कार मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Google CEO Sundar Pichai: कालच पद्मभूषण मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय?
mumbai: FIR registered against Google CEO Sundar Pichai in copyright case
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 6:46 PM

मुंबई: केंद्र सरकारकडून कालच पद्मभूषण पुरस्कार मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पिचाई यांच्यासहीत कंपनीच्या पाच जणांविरोधात कॉपीराईट अधिनियमाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दर्शन यांचा ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा सिनेमा युट्यूबवर (YouTube) अपलोड करण्यात आला आहे. कोणतेही हक्क न घेता अधिकार नसलेल्या लोकांमार्फत गुगलने (Google) हा सिनेमा युट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचा आरोप दर्शन यांनी केला आहे. त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा दर्शन यांनी केला आहे. दर्शन यांच्या या तक्रारीमुळे पिचाई हे अडचणीत आले आहेत.

कॉपीराईटचं उल्लंघन झाल्याचा दावा करत सुनील दर्शन यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अन्य पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अधेरी पश्चिमेतील एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कॉपीराइट अॅक्ट 1957च्या कलम 51, 63 आणि 69 अन्वये एफआयआर दाखल केला आहे. सुनील दर्शन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 2017मध्ये त्यांचा एक हसीना थी हा शेवटचा सिनेमा केला होता. मात्र, त्यांची परवानगी न घेता हा सिनेमा युट्यूबवर डाऊनलोड केल्याचा त्यांचा आरोप आहे.

कोणी तरी पैसे कमावत आहे

याबाबत सुनील दर्शन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली आहे. मी माझा सिनेमा युट्यूबला अपलोड केला नाही. तसेच हा सिनेमा मी विकलाही नाही. मात्र, युट्यूबवर हा सिनेमा अपलोड झाला आहे. त्याला कोट्यवधी व्ह्यूज आहेत. तुमच्या प्लॅटफॉर्मवरून हा सिनेमा हटवावा अशी मी युट्यूबला वारंवार विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. कोणी तरी बेकायदेशीरपणे माझा सिनेमा अपलोड करून पैसे कमावत आहे. त्यामुळे अखेर मला वैतागून कोर्टात जावं लागलं. कोर्टाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेस दिले आहेत. मी तंत्रज्ञानाला चॅलेंज करत नाहीये. पण तंत्रज्ञानाचा असा वापर करणं योग्य नाही, असं दर्शन यांनी सांगितलं.

सुंदर पिचाईंना पद्मविभूषण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला काल केंद्र सरकारने सुंदर पिचाई यांना पद्म पुरस्कार घोषित केला. पद्म पुरस्कारात 128 लोकांची नावे होती. त्यातील चार लोकांना पद्म विभूषण देण्यात आला. त्यातील तिघांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 17 जणांना पद्म भूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Kolkata Murder: कपडे सुकवण्यावरून भांडण, कोलकात्यात मोठ्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

हॉटेलमधील CCTVने टिपले मृत्यूआधीचे हसरे चेहरे! सातही जणांनी हॉटेलात केक कापला, जेवण केलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.