तांत्रिक विद्येच्या आधारे जे काही घडलंय ते धक्कादायकच, दाराबाहेरील दृश्य पाहून धक्काच बसेल, नेमकं काय घडलं ?

शेजाऱ्यांमध्ये जुना वाद होता. या वादातून शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने जे केलं ते भयंकर होतं. शेजाऱ्याचा काटा काढण्यासाठी शेजाऱ्याने जे कृत्य केले त्यानंतर त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली.

तांत्रिक विद्येच्या आधारे जे काही घडलंय ते धक्कादायकच, दाराबाहेरील दृश्य पाहून धक्काच बसेल, नेमकं काय घडलं ?
तांत्रिक विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 4:55 PM

मुंबई / गोविंद ठाकूर : तांत्रिक विद्येच्या जोरावर शेजाऱ्याच्या एकुलत्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या भोंदूबाबाला बोरिवीच्या एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर सदर बाबाचे ऑपरेशन झाले असल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. तसेच तपासात सहकार्य करण्यास सांगितले. गोकुळ भारवाड असे आरोपी बाबाचे नाव आहे. पीडित कुटुंब आणि सदर तांत्रिक बाबा एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांमध्ये काही कारणातून वाद सुरु आहे. या वादातून आरोपीने शेजाऱ्याला धमकावण्यासाठी सर्व प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.

सीसीटीव्हीत बाबा कैद

तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, आरोपी तांत्रिक बाबा सीसीटीव्हीत दिसून आला. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हातात पांढऱ्या रंगाचा बॉक्स घेऊन फिर्यादीच्या फ्लॅटच्या दिशेने गेला. त्यानंतर बॉक्समध्ये मिरच्या, मीठ, लिंबू ठेवले आणि संदेस लिहून परत येत असल्याचे दिसले.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी तांत्रिक बाबाची ओळख पटवली. यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी तांत्रिक बाबाला अटक केली. पोलीस बाबाची अधिक चौकशी केली. तांत्रिक बाबा आणि शेजाऱ्याचे जुने वैर होते. त्यामुळे तांत्रिक बाबा शेजारच्या मुलाची हत्या करण्यासाठी तांत्रिक विद्या वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा

आरोपीचे ऑपरेशन झाल्याने समज देऊन सोडले

बाबा आजारी असून,त्याचे आठवडाभरापूर्वी ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी तांत्रिक बाबाला आयपीसीच्या कलम 41 अंतर्गत नोटीस पाठवून त्याला सहकार्य करण्यास सांगितले. पोलिसांनाही वरिष्ठ पातळीवरुन पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. सध्या पोलीस बाबाकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.