Mumbai Crime : आधी काकूवर चाकूने केला वार, नंतर भावालाही इजा, २० वर्षांच्या हल्लेखोराला तासाभरात अटक; पण त्याने असं केलं तरी का ?

आरोपीने त्याच्या अवघ्या ११ वर्षांच्या भावालाही इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अटक केली.

Mumbai Crime : आधी काकूवर चाकूने केला वार, नंतर भावालाही इजा,  २० वर्षांच्या हल्लेखोराला तासाभरात अटक; पण त्याने असं केलं तरी का ?
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 12:58 PM

मीरा-भाईंदर | 1 नोव्हेंबर 2023 : सध्या मुंबईत गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशीच एक घटना मीरा-भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. तेथे एका तरूणाने घरात घुसून त्याच्या काकूची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास मीरा-भाईंदरमधील क्वीन्स पार्क एरिआमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तासाभराच्या आतच अटक केली. जिशान खाने असे आरोपीचे नाव असून तो अवघा २० वर्षांचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना खान (३१) असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या कुटुंबासह क्वीन्स ॲव्हेन्यू इमारतीत राहत होत्या. आरोपी जिशानहा त्याच परिसरात राहतो. सोमवारी दुपारी जिशना जबरदस्तीने शबाना यांच्या घरात घुसला आणि त्याने चाकूने त्यांच्यावर वार केले. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्याने त्याच्या 11 वर्षीय चुलत भावाला (मृत महिलेचा मुलगा) इजा करण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या सदस्यांनी धाव घेत जखमी शबाना हिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. शबाना हिचा आधीच मृत्यू झाला होता, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

का केली हत्या ?

” या हल्ल्याची आणि हत्येची माहिती मिळताच, आम्ही तातडीने विशेष पथके तयार केली आणि शोध घेऊन एका तासात भाईंदर (पश्चिम) येथून आरोपीला पकडले,” असे पोलिसांनी सांगितले. अवघ्या २० वर्षांच्या या तरूणाने हे कृत्य नेमकं का केलं, काकूलर आणि त्यानंतर तिच्या मुलावरही वार का केले, या गुन्ह्यामागचा नेमका हेतू अद्याप समजू शकलेला नाही. मात्र पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी नमूद केलं.

हल्लेखोर जिशान याचे कुटुंबीय आणि हल्ल्यात मृत झालेल्या शबाना यांचे, कुटुंबिय, दोघेही मूळ मध्य प्रदेशातील असून काही वर्षांपासून ते मीरा रोड येथील क्वीन्स पार्क परिसरात रहात होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यामागचा नेमका हेतू काय होता आणि आरोपीला कोणी मदत केली होती का, याचा तपास पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र या हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही. दरम्यान या घटनेने आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.