AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : शिवाजी पार्कमधील मरीन झू पुन्हा चर्चेत, सहा प्राण्यांच्या चोरीने खळबळ

गेल्या महिन्यात या झूमधून मगरीचे पिल्लू गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती. नंतर ते पिल्लू महानगर पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये आढळले होते.

Mumbai News : शिवाजी पार्कमधील मरीन झू पुन्हा चर्चेत, सहा प्राण्यांच्या चोरीने खळबळ
| Updated on: Nov 02, 2023 | 9:24 AM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : दादरच्या शिवाजी पार्क एरियामध्ये असलेले मरीन झू (zoo)  पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मरीन ॲक्वा झू मधून प्राण्यांची चोरी (animals stolen) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे अजगर, घोरपडी, पाल आणि सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

झू मधून प्राणी अचानक चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्राणी संग्राहालय तात्पुरते बंद असणार असल्याच फलक देखील लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे ६ अजगर, २ घोरपडी, १ पाल आणि सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. हे प्राणी प्रदर्शनासाठी सोमय्या विद्याविहार कॉलेज कॅम्पसमध्ये नेण्यात येणार होते, अशी माहिती मरीन ॲक्वा झू च्या विश्वस्तांनी दिली. मात्र त्यापूर्वीच ते चोरीला गेल्याने गदारोळ माजला आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीला गेलेल्या प्राण्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान या झू मधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई केली होती. झू मधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं होतं. मात्र प्राणी संग्रहालया वरील कारवाई मागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोपी प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला होता.

प्राणी संग्रहालयातून मगरीचं पिल्लू झालं होतं गायब

गेल्या महिन्यात हे प्राणी संग्रहालय बरंच चर्चेत आलं होतं. कारण त्यामधील मगरीचं एक पिल्लू गायब झालं आणि ते शेजारी असलेल्या पालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये आढळलं होतं. याबाबत स्वीमिंग पूल आणि थिएटरचे को-ऑर्डिनेचर संदीप वैशंपायन यांनी अधिक माहिती दिली. हा स्वीमिंग पूल रोज सकाळी मेंबर्ससाठी खुला करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याची बारकाईने पाहणी केली जाते, तसेच सफाईही होते.

नेहमीप्रमाणे त्या दिवशीही 5.30 वाजण्याच्या सुमारास स्वीमिंग पूलची पाहणी केली असता, कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळलं. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने कारवाई करत या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले. हे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र त्या घटनेनेही खळबळ उडाली होती.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.