Mumbai Crime : बारमध्ये गोंधळानंतर त्याने “बॅकअप” पथक बोलावलं, पण खरे पोलिस येताच उडाली तारांबळ.. तो नक्की होता कोण ?

गस्तीवर असलेले अधिकारी तेथे पोहोचले असता त्या पोलिसाने त्याचे ओळखपत्र दाखवले, मात्र ते पाहून क्षणात सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. आणि त्यांनी त्या पोलिसालाच बेड्या ठोकल्या. हे पाहून आजूबाजूचेही चक्रावले

Mumbai Crime : बारमध्ये गोंधळानंतर त्याने बॅकअप पथक बोलावलं, पण खरे पोलिस येताच उडाली तारांबळ.. तो नक्की होता कोण ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 12:52 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : नागरिकांची सुरक्षा करणं, गुन्हेगारांना रोखणं, शिक्षा करणं हे पोलिसांच काम असतं. बहुतांश पोलिस त्यांचं कर्तव्य तत्परतेने पार पाडतात. पण पोलिसानेच सामान्यांना त्रास दिला तर ? अशा वेळी काय करायचं ? अशाच एका पोलिसाने दारू पिऊन बारमध्ये (mumbai crime) गोंधळ घातला, राडा पेटला आणि हाणामारीही झाली. शेवटी त्याने बॅकअपसाठी खऱ्या पोलिसांना कॉल केला. मात्र ते तेथे आल्यावर खरा प्रकार उघडकीस आला, जे पाहून सर्वच चक्रावले.

वाचून तुम्हीही चक्रावलता ना ? चला तर मग जाणून घेऊया की तिकडे नक्की काय घडलं. तर झालं असं की एका तोतयाने आपण पोलिस असल्याची बतावणी करून सर्वांना उल्लू बनवलं. फुकट दारू पिण्यासाठी त्याने आपण पोलिस असल्याचा दावा केला आणि पैसे देण्यासही नकार दिला. यावरून बारमालक आणि त्याच्यात वाजलं, मारामारीही झाली. अखेर त्या इसमाने बॅकअपसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला आणि पोलिसांचे पथक आल्यावर त्याचं पितळ उघडं पडलं. इतका वेल पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या त्या तोतयाला ‘खऱ्या’ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

नेमकं काय झालं ?

मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास, बांगूर नगर पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून कॉल आला की गोरेगाव पश्चिम येथील ओशिवरा बेस्ट बस डेपोसमोर असलेल्या स्वामी बारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला बॅकअप घेणे आवश्यक आहे. त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेल्या हवालदारांना तिथे, घटनास्थळी पाठवण्यात आले, असे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी सांगितले. तिथे गेल्यानंतर निलेश पोखरकर नावाचा इसम तिथे मद्यधुंद अवस्थेत बारच्या व्यवस्थापकाशी वाद घालत होता. त्याबद्दल चौकशी केली असता बार मॅनेजरने सगळा प्रकार सांगितला.

फुकट दारूसाठी बनला पोलीस

निलेश पोखरकर हा इसम गेल्या काही तासांपासून बारमध्ये बसून मद्यपान करत होता. शेवटी जेव्हा त्याला बिल देण्यात आले, तेव्हा त्याने आपण पोलीस असल्याचा रुबाब झाडत पैसे देण्यास नकार दिला. मॅनेजरसमोर त्याने त्याचं “ओळखपत्र” फ्लॅश केलं आणि पैसे मागितले, तर अटक करू अशी धमकीही दिली. त्याचीही अरेरावी पाहून मॅनेजर संतापला. पैसे भरल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही , असे त्याने निलेशला सांगितले आणि रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे निलेशने थेट बार मॅनेजरची कॉलर पकडली. इतर कर्मचारी मध्यस्थी करायाला आल्यानंतरही तो मागे हटलाच नाही आणि मॅनेजरला मारहाणही केली.

दारूच्या नशेत असलेल्या निलेशने नंतर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर डायल केला आणि कर्तव्य बजावत असताना त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याला तातडीने बॅकअपची आवश्यकता आहे, असे नियंत्रण कक्षाला कळवले. त्यानंतर गस्तीवरील पोलिस तेथे आले असता कॅज्युअल कपड्यांमध्ये असलेला पोखरकर तिथे उपस्थित होता. मॅनेजरनेच आपल्याशी वाद घातला आणि मारहाण केली असा आरोपी त्याने केला.

अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तो कोणत्या पोलिस ठाण्यात आहे, असेही त्याला विचारले असता, पोखरकर याने त्याचे ओळखपत्र काढले आणि ते गस्ती पथकासमोर फडकवले.’ मीघाटकोपर पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाशी संलग्न आहे. या बारमध्ये मला एका गुप्तचराला भेटायचे होते. गेल्या सात वर्षांपासून मी पोलीस खात्यात काम करत असून दोन महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे नियुक्ती झाली,’ असा दावा त्याने केला.

मात्र हे सर्व ऐकून पोलिसांना संशय आला , काहीतरी गडबड आहे असे वाटल्याने त्यांनी पोखरकरच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात कॉल करून चौकशी केली. तेव्हा पोखरकर हा खोटे दावे करत बडबड करत असल्याचे समोर आवले. “ अखेर तोतयागिरी केल्याच्या आरोपावरून आम्ही पोखरकरला अटक केली,” असे पोलिसांनी सांगितले. तोतया पोलिस बनलेल्या पोखरकरला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.