Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती सतत विचारात असायची, पतीच्या नजेरतून तिची चिंता सुटली नाही, मग त्याने विश्वासात घेऊन विचारणा केली अन्…

पत्नी सतत चिंताग्रस्त असायची. पतीला तिच्या वागण्यातील बदल लक्षात येत होता. एक दिवस त्याने विश्वासात घेऊन पत्नीला चिंतेचे कारण विचारलं अन् धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.

ती सतत विचारात असायची, पतीच्या नजेरतून तिची चिंता सुटली नाही, मग त्याने विश्वासात घेऊन विचारणा केली अन्...
महिलेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या शेजाऱ्याला अटकImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 4:01 PM

मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. मुंबई, दिल्लीसारख्या शहरातही महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. शेजाऱ्याने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने पतीसह पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कलम 376 (बलात्कार), 354A (लैंगिक छळ), 354B, 354C (व्हॉय्युरिझम), 354 सी, 509, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

वर्षभरापूर्वी 22 मार्च 2022 रोजी महिलेचा कामावर गेला असता ती एकटी असल्याची संधी साधत आरोपी तिच्या घरी आला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तीन दिवसांनंतर, त्याने महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या पतीला बलात्काराच्या घटनेची माहिती देण्याची धमकी देऊन तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेचे व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट घेतले. मे महिन्यात, त्याने हे अश्लील फोटो त्याच्या मित्राला दाखवले. तो ही त्याच्या शेजारीच राहत होता. नंतर त्या दोघांनी पतीला फोटो दाखवण्याची धमकी देत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला.

‘असा’ झाला उलगडा

महिलेसोबत घडत असलेल्या या प्रकारामुळे ती सतत चिंतेत असायची. पतीला तिची बदलेली वागणूक लक्षात आली. पतीने तिला विश्वासात घेत तिच्या चिंतेचे कारण विचारले. यानंतर महिलेने वर्षभरापासून सुरु असलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. यानंतर पतीने महिलेसोबत थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली.

हे सुद्धा वाचा

मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय अहवालातही महिलेसोबत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधील सर्व व्हिडिओ, फोटो आणि मॅसेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपपत्रासाठी तांत्रिक तपासाचा भाग म्हणून पुरावे फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.