रेल्वे स्थानकात भीक मागत होती, महिलेने घरी आणले, काम दिले, पालनपोषण केले; पण तिने…

ती अनाथ आणि अपंग होती. रेल्वेस्थानकावर भीक मागून पोट भरत होती. दररोज तेथून जाणाऱ्या महिलेने तिला पाहिले आणि तिची दया आली. महिलेने तिला घरी आणले, तिचे पालनपोषण केले, लग्न केले आणि हाताला कामही दिले. तिच्या मनात मात्र वेगळेच सुरु होते.

रेल्वे स्थानकात भीक मागत होती, महिलेने घरी आणले, काम दिले, पालनपोषण केले; पण तिने...
पैशासाठी मोलकरणीने मालकिणीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 3:46 PM

मुंबई / ब्रिजभान जैस्वार-गोविंद ठाकूर : मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेली 25 वर्षे ज्या जिने इमाने इतबारे आपल्या मालकिणीची सेवा केली, घरकाम सांभाळले. तिनेच एक सोन्याची चैन आणि मोबाईलसाठी मालकिणीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा असे मयत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला अपंग असून, 25 वर्षांपूर्वी मालकिणीने तिच्यावर दया दाखवत तिला रेल्वेस्थानकावरुन घरी आणले आणि काम दिले. पण याची परतफेड मोलकरणीने ज्या पद्धतीने केली ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. पोलिसांनी महिलेसह तिला साथ देणारा तिचा पती आणि मुलगा या तिघांनाही अटक केली आहे.

अनाथ शबनमला महिलेने रेल्वेस्थानकातून घरी आणले होते

मोहम्मद उमेर इब्राहिम शेख, शबनम प्रवीण ऊर्फ मोहम्मद उमेर शेख, मोहम्मद शहजाद उमेर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी मोलकरीन शबनम ही अनाथ असून, 25 वर्षापूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागत होती. डिकोस्टा यांचे स्टेशन परिसरात रोज येणे-जाणे होते. यावेळी डिकोस्टा यांनी शबनमला पाहिले अन् त्यांना अनाथ आणि अपंग असणाऱ्या शबनमवर दया आली. डिकोस्टा यांनी शबनमला आपल्या घरी आणले. आपल्या घरी तिला काम दिले. तिचे पालनपोषण केले. मग लग्नही लावून दिले.

पैशाच्या हव्यासापोटी 25 वर्षांचे जिव्हाळ्याचे नाते विसरली

गेली 25 वर्षे शबनम डिकोस्टा यांच्या घरी काम करत आहेत. मात्र शबनमला वाटायचे आपल्याकडे मालकिणीकडे खूप पैस आहे. या पैशासाठी ती मालकिणीचे उपकार विसरली. मालकिणीला मारुन घरातील पैसे लुटायचा तिने पती आणि मुलासोबत कट रचला. त्यानुसार डिकोस्टा यांचा नातू गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेला असताना तिने संधी साधून पती आणि मुलाच्या मदतीने मालकिणीला बाथरुममधील पाण्याच्या बादलीत बुडवून मारुन टाकले. यानंतर मालकिणीची सोन्याचा चैन, मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन पसार झाली.

हे सुद्धा वाचा

शेजारी महिलेला पहायला गेले असता घटना उघड

डिकोस्टा यांचा नातू त्यांना फोन करत होता. मात्र आजी फोन उचलत नसल्याने त्याने शेजारी फोन करुन पहायला सांगितले. त्याप्रमाणे शेजारी डिकोस्टा यांच्या घरी पहायला गेले असता घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला.

तिघा आरोपींना पोलिसांकडून अटक

पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शबनम आणि तिचा मुलगा घरातून बाहेर पडताना दिसले आणि एक मास्कधारी व्यक्ती घरी शिरताना दिसला. यानंतर पोलिसांनी शबनमला स्टेशन परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.