गाडीच्या काचेवर टकटक करणारी ‘गँग’, मुंबईत मोबाईल, लॅपटॉपसह मौल्यवान वस्तू चोरणारे गजाआड

राज्याची राजधानी मुंबईच्या विविध भागांमध्ये चोरीचा सपाटा लावणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी कारवाई केलीय.

गाडीच्या काचेवर टकटक करणारी 'गँग', मुंबईत मोबाईल, लॅपटॉपसह मौल्यवान वस्तू चोरणारे गजाआड
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 6:20 PM

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईच्या विविध भागांमध्ये चोरीचा सपाटा लावणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी कारवाई केलीय. ही टोळी गाडीवर टक टक करत गाडी चालकाचे लक्ष दुसरीकडे वेधत आणि गाडीमधील मौल्यवान वस्तू चोरी करायचे. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन येथे अशाच प्रकारे चोरी झाली होती. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी शोध घेत तीन गुन्हेगारांना अटक केलं आहे (Mumbai Police arrest Taktak gang of thief who looted citizens traveling in cars).

मुंबईच्या रस्त्यांवर केवळ गाडीच्या काचेवर एक टकटक झालं आणि मोबाईल किंवा लॅपटॉप चोरीला गेल्याच्या विचित्र घटना सुरुयेत. मात्र, पोलिसांनी गाडीतून मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मात्र, अद्याप असं करणारे किती जण मुंबईत आहेत याचा शोध लागलेला नाही.

मुंबईच्या सिग्नलवर किंवा भर रस्त्यात गाडीच्या काचेवर टकटक झाल्यास सावधान

टक टक गँग मुंबईत कार्यरत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढलीय. ही गँग लक्ष विचलित करून चोर्‍या करत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे येत आहेत. ही टक टक गँग मुंबईत गाडीतील मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरत लोकांना लुटत आहे. त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरत आहेत. मुंबईच्या सिग्नलवर किंवा भर रस्त्यात तुमच्या गाडीतील काचेवर कोणी टकटक केलं, तर सावधान राहा. कारण तुमच्या गाडीतील हीच टक टक मौल्यवान वस्तू चोरीसाठी कारणीभूत ठरु शकते.

गाडीमधील मौल्यवान वस्तू किंवा मोबाईल चोरीला

काही व्यक्ती गाडीजवळ येऊन काचेवर टक टक करतात आणि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. यावर आपण काच खाली करतो त्याच दरम्यान दुसरा माणूस दुसऱ्या बाजूच्या काचेवर टकटक करतो आणि आपल्या लक्ष तिकडे जावं म्हणून तो आपल्याशी काहीतरी बोलतो आणि त्याच दरम्यान गाडीमधील मौल्यवान वस्तू किंवा मोबाईल चोरीला जातो. अशाच प्रकारे कार्यरत असलेल्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक

ही टोळी मुंबईच्या विविध भागात गाडीवर टक टक करत गाडी चालकाचे लक्ष दुसरीकडे वेधत गाडीमधील मौल्यवान वस्तू चोरी करायचे. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन येथे अशाच प्रकारे चोरी झाली होती. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी शोध घेत तीन गुन्हेगारांना अटक केली. हे तिघे आरोपी मेरठ येथून येऊन मुंबईमध्ये चोरी करायचे.

सोहेल, अब्राहम आणि फईम अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या वस्तू ही टोळी नेपाळ येथे जाऊन विकत असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणखी कुठे चोरी केली आहे आणि या टोळीमध्ये कोण कोण सामील आहेत याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

अखेर कुख्यात गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, उद्या किल्ला कोर्टात हजर करणार

तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

PMOच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आणि सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची कामगिरी

व्हिडीओ पाहा :

Mumbai Police arrest Taktak gang of thief who looted citizens traveling in cars

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.