सावधान! ते मुलींना समुद्र किनाऱ्यावर बोलवतात, टच करतात, शूट करतात, मुंबई सायबर सेलकडून भांडाफोड !

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  (Mumbai Police obscene Prank Video)

सावधान! ते मुलींना समुद्र किनाऱ्यावर बोलवतात, टच करतात, शूट करतात, मुंबई सायबर सेलकडून भांडाफोड !
मुंबई सायबर सेलकडून भांडाफोड !
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 5:13 PM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमार्फत एक धक्कादायक प्रकार उघड करण्यात आला आहे. प्रँक करण्याच्या बहाण्याने मुलींना बोलवून त्यांच्यासोबत अश्लील आणि असभ्य वर्तवणूक केली जाते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Mumbai Police Arrest three People who involve in obscene Prank Video)

नेमकं प्रकरणं काय? 

सध्या युट्यूब तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक प्रकार केले जात आहे. सध्या प्रँक व्हिडीओ हा प्रकार चांगलाच चर्चेत आहे. प्रँक करणं म्हणजे एखाद्याची खोडी करणे. पण नुकंतच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

ही टोळी प्रँक करण्यासाठी अनेक मुलींनी विविध समुद्रकिनारी बोलवायची. यातील काही तरुण मुलं त्या मुलींसोबत अश्लील भाषा किंवा अश्लील चाळे करतं. समुद्रकिनाऱ्यावर हे व्हिडीओ शूट केले जात. यावेळी मुलाकडून अश्लील भाषेचा वापर केला जात. तसेच मुलींच्या काही प्रायव्हेट पार्ट टच केला जात. या सर्व गोष्टी प्रँक व्हिडीओ संबंधित आहे, असे भासवण्यात यायचे. हा आरोपी मुलींना धमकावून व्हिडीओ बनवत असे.

या सर्व घटनानंतर काही मुलींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी हा दहावीमध्ये टॉपर होता. पैसे मिळावे यासाठी तो अशाप्रकारचे अश्लील व्हिडीओ बनवायचा. तसेच तो ट्यूशन क्लासही चालवतो. याप्रकरणी 17 युट्यूब चॅनल्सला नोटीस बजावण्यात आली आहे.

आरोपींवर कडक कारवाई

मुंबई पोलीस हे महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे आम्ही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अनेक तरुण आणि तरुणी जलदगतीने पैसा मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या व्हिडीओमध्ये सहभागी होतात. मात्र त्यांनी यात सहभाग घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच हा प्रकार जर कोणासोबत घडला असेल, तर त्यांनी सायबर सेल किंवा मुंबई पोलिसांकडे तक्रार करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.  (Mumbai Police Arrest three People who involve in obscene Prank Video)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत दुकानदाराच्या डोळ्यादेखत सोन्याचे दागिने घेवून महिला पसार, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाचा निर्घृण खून, नांदेडमध्ये विवाहित महिलेसह प्रियकराला अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.