हातावर ‘बदाम आणि क्रॉस’ असलेल्या गोंदणामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 15 वर्षांपासून होता फरार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पोलिसांना, त्या आरोपीचा नंबर मिळाला. त्यानंतर आरोपी सतत जागा बदलत असल्याचे पोलिसांना दिसून आले, आरोपी मुंबई दर्शन करीत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याची एका ट्रॅव्हल्स एजन्सीकडे चौकशी केली.

हातावर 'बदाम आणि क्रॉस' असलेल्या गोंदणामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 15 वर्षांपासून होता फरार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
CRIME PHOTOImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 1:07 PM

मुंबई : मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) नेहमीचं कौतुक केलं जातं, अनेक भल्या मोठ्या गुन्हेगारांना त्यांनी काही क्षणात ताब्यात घेतल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक अवघड प्रकरण पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हाताळली आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांना अधिक मानलं जात. मागच्या पंधरा वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मुंबई पोलिस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आरोपीच्या (criminal) हातावर असलेल्या गोंदणामुळे (tattoo) तो सापडला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्याचबरोबर तो पोलिसांना अनेकदा गुंगारा देत होता.

हातावर असलेल्या गोंदणावरून…

मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हातावर गोंदण असणाल्यामुळे त्या आरोपीला अटक केली आहे. घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणात आरोपीला फरार घोषित केलं होतं. आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र उर्फ मुदलियार (65) असं आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नाव बदलून विविध पत्त्यांवर वास्तव्य करत होता. मात्र रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार हातावर ‘बदाम आणि क्रॉस’ असलेल्या गोंदणाच्या माहितीमुळे आरोपीला अटक झाली. आरोपी सध्या ‘मुंबई दर्शन’ दाखवणाऱ्या एक खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करत होता.

संपूर्ण मुंबईत शोधण्याचा प्रयत्न केला

विविध गुन्हे दाखल असलेला आरोपी सुनावणीसाठी हजर राहत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला फरार घोषित केलं होतं. पोलिसांनी त्याला संपूर्ण मुंबईत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अनेक ठिकाणं बदलून राहत असल्यामुळे पोलिसांना सापडत नव्हता. आरोपीने आतापर्यंत माहिम, भांडूप, कल्याण अशा विविध ठिकाणी वास्तव केल्याचं उघडकीस आलं आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना, त्या आरोपीचा नंबर मिळाला. त्यानंतर आरोपी सतत जागा बदलत असल्याचे पोलिसांना दिसून आले, आरोपी मुंबई दर्शन करीत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याची एका ट्रॅव्हल्स एजन्सीकडे चौकशी केली. तिथं तो असल्याचं समजलं, पोलिसांनी साध्या वेशात त्याची चौकशी करुन त्याला ताब्यात घेतलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.