Saki Naka rape : आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार (Rape) पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
मुंबई : मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार (Rape) पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी साकीनाक्यातली घटना ही मन सुन्न करणारी असल्याचं म्हटलं. अशा घटना घडल्या तर त्या मुंबईच्या लौकिकाला साजेशी नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं. मुख्य न्यायमूर्तींना भेटून हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी भेटले पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडितेचा मृत्यू
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या