वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ

मुंबईच्या वसई परिसरात चार जणांनी एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार (Mumbai Woman Kidnapped By 4 Man) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ
Woman Kidnapping
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:40 AM

वसई : मुंबईच्या वसई परिसरात चार जणांनी एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार (Mumbai Woman Kidnapped By 4 Man) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी यादरम्यान महिलेचा आपत्तिजनक अवस्थेतील व्हिडीओही तयार केला आणि तिला विवस्त्र सोडून तेथून पळ ठोकला. हे आरोपी महिलेला भिवंडीच्या जंगलात घेऊन गेल्याचं महिलेने पोलिसांनी सांगितलं (Mumbai Woman Kidnapped By 4 Man).

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली, तिला विवस्त्र केलं. त्यानंतरही नराधमांचं मन भरलं नाही, त्यांनी महिलेचे केस कापले. त्याशिवाय, या घटनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली.

महिलेला चिंचोती नाक्याच्या जंगलात नेलं

त्यानंतर या आरोपींनी महिलेला विना कपडे तिथेच सोडलं जिथून तिचं अपहरण केलं होतं. महिलेने निजामपूर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली आहे. आता हे प्रकरण वालिव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

वालिव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास चौगुले (Vilas Chaugule) यांनी सांगितलं की, “महिलेच्या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास सुरु केला आहे. महिलेने तक्रारीत सांगितलं की तिला आरोपींनी ऊसाचा रस पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर आरोपी पीडित महिलेला चिंचोती नाक्याजवळील जंगलात घेऊन गेले.”

महिलेचं अपहरण का केलं?

आरोपी महिलेला विवस्त्र अवस्थेत सोडून गेले. त्यानंतर पीडिता कशीबशी वसई येथील तिच्या घरी पोहोचली. महिलेने तीन आरोपींची ओळख केली आहे तर एकाची ओळख अद्याप झालेली नाही.

विलास चौगुले यांनी सांगितलं की, “आरोपींनी भारतीय दंड संहिता (IPC) 328 (विष देण्याचा प्रयत्न), 354 (छेडछाड) आणि 342 (जबरदस्तीने पकडून ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”

विलास चौगुले यांनी सांगितलं की, “महिलेला सध्या मानसिक आघात बसला आहे. त्यामुळे आम्ही तिला जास्त प्रश्न विचारु शकत नाही. जेव्हा ती मानसिकरित्या स्टेबल असेल तेव्हा आम्ही तिच्याकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेऊ. महिलेचं अपहरण त्यांनी का केलं याचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही लवकरच आरोपींना अटक करु.”

Mumbai Woman Kidnapped By 4 Man

संबंधित बातम्या :

साडीने गळा आवळून पतीची हत्या, 35 वर्षीय महिलेला अटक

माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील ‘त्या’ खुनाचा उलगडा

धक्कादायक! सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.