Ichalkaranji Murder : तीस रुपयांसाठी जीव घेतला, दारुला पैसे न दिल्याचा राग, तरुणाकडून भिकार्‍याची हत्या

दगड डोक्यात घातल्याने भिकारी रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला. यावेळी सुनीलने तेथून पळ काढला. याच वेळी शहरातील 112 पोलीस व्हॅन गस्त घालत होती. यावेळी पोलिसांनी सुनीलच्या अंगावर रक्ताचे डाग पाहिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण एका इसमाची हत्या केल्याचे सांगितले.

Ichalkaranji Murder : तीस रुपयांसाठी जीव घेतला, दारुला पैसे न दिल्याचा राग, तरुणाकडून भिकार्‍याची हत्या
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 3:48 PM

इचलकरंजी : दारुला 30 रुपये दिले नाही म्हणून एका युवकाने भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी शहरातील डेक्कन परिसरात घडली आहे. सुनील लिंगाप्पा पाटील असे आरोपीचे नाव असून तो मरगुबाई मंदिर जवळ पूर्वी गल्ली जवाहरनगर येथे राहतो. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. मयत भिकारी एका मुस्लीम समाजाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

दारुला पैसे दिले नाही म्हणून भिकाऱ्याची हत्या

इचलकरंजी शहरामध्ये असणाऱ्या डेक्कन चौक परिसरात पटेल यांच्या दुकानासमोरील कट्ट्यावर भिकारी जेवत होता. रात्री एकच्या सुमारास सुनील पाटील हा युवक कामावरून रात्री घरी जात होता. यावेळी सुनीलने दारूची नशा केली होती. त्यावेळी त्याचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व त्याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्या भिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या सुनील पाटीलने त्याला धक्काबुक्की करून मारहाण केली.

दगड डोक्यात घातल्याने भिकारी रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला. यावेळी सुनीलने तेथून पळ काढला. याच वेळी शहरातील 112 पोलीस व्हॅन गस्त घालत होती. यावेळी पोलिसांनी सुनीलच्या अंगावर रक्ताचे डाग पाहिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण एका इसमाची हत्या केल्याचे सांगितले. त्यावेळी तेथे असणारे 112 मधील पोलिसांनी तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीला पोलिसांकडून अटक

घटनास्थळी पाहणी व पंचनामा करून साक्षीदार तपासून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. सुनील पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. भिकार्‍याची हत्या झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पी बी महामुनी, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. भिकाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. सध्या तो एका मुस्लिम समाजाचा असल्याचे सध्या दिसून येत आहे. भिकाऱ्याला कुणी ओळखत असल्यास शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Murder of a beggar by a young man for not paying for alcohol)

इतर बातम्या

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं

Pune crime| पुण्यात रस्त्यावर श्वानाने घाण का केली?म्हणत चिडलेल्या तरुणाने श्वान मालकाला ‘धुतले’ ; वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.