22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा

सेक्स करताना तिने आपल्याला चोक करण्यास सांगितलं होतं, मात्र अपघाताने तिचा मृत्यू झाला, असा दावा आरोपी जेसने केला होता (Murder of Grace Millane )

22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा
ग्रेस मिलान
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 4:23 PM

वेलिंग्टन : शारीरिक संबंधांवेळी गुदमरल्यामुळे ग्रेस मिलान (Grace Millane) हिचा मृत्यू झाला, असा कांगावा करणाऱ्या मारेकऱ्याला कोर्टाने झापलं. ब्रिटीश पर्यटक ग्रेस मिलानची 2 डिसेंबर 2018 रोजी 22 व्या वाढदिवशी न्यूझीलंडमध्ये हत्या झाली होती. हत्येचा आरोप असलेला 26 वर्षीय तरुण जेस केम्पसन (Jesse Kempson) याने सेक्स करताना चोकिंगमुळे (Choking) ग्रेसला प्राण गमवावे लागले, असा दावा केला होता. (Murder of British Backpacker Grace Millane Jesse Kempson claimed she died during choking in consensual sex)

पीडितेवरच मृत्यूचं खापर फोडल्याबद्दल जेस केम्पसनला न्यूझीलंड कोर्टाने झापलं. कोर्टाच्या या पावलाचं मयत ग्रेसच्या कुटुंबाने स्वागत केलं. सेक्स करताना तिने आपल्याला चोक करण्यास सांगितलं होतं, मात्र अपघाताने तिचा मृत्यू झाला, असा दावा हत्येचा आरोप असलेल्या जेसने केला होता. मात्र अशा नीच पातळीच्या दाव्यांना निकालात काढणाऱ्या घरगुती हिंसाचार विधेयकातील कलमांबद्दल (rough sex gone wrong) ग्रेसच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केलं. 22 वर्षीय तरुणीच्या सेक्स लाईफबद्दल कोर्टात चर्चा केल्याने जगभर त्याविषयी छापून आलं.

नेमकं काय घडलं?

ग्रेस मिलान ही यूकेतील विकफॉर्डची रहिवासी होती. लिंकन युनिव्हर्सिटीतून तिने जाहिरात आणि मार्केटिंग विषयात पदवी मिळवली होती. त्यानंतर ती बॅकपॅकिंग टूरवर निघाली होती. दक्षिण अमेरिकेत सहा आठवडे घालवल्यानंतर ती दोन आठवड्यांसाठी न्यूझीलंडला थांबली होती.

30 नोव्हेंबरला 2018 रोजी ग्रेस ऑकलंडला गेली. दोन डिसेंबर हा तिचा वाढदिवस. त्याच्या आदल्या रात्री नऊ वाजता ती व्हिक्टोरिया स्ट्रीटवर दिसली. तर 15 मिनिटात ती स्कायसिटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 9:41 वाजता सिटीलाईफ हॉटेलमध्ये जेस केम्पसनसोबत ती अखेरची दिसली.

ग्रेस हरवल्याची तक्रार

2 डिसेंबर 2018 रोजी वाढदिवसाच्या मेसेजना तिने उत्तर न दिल्यामुळे मिलान कुटुंबीय चिंतीत झाले. तीन दिवसांनी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरु झाला. ग्रेस गायब झाली, त्या रात्री आपल्या रुममध्ये परत गेली नसल्याचं ती राहत असलेल्या हॉटेलने सांगितलं.

आठ दिवसांनी मृतदेह सापडला

9 डिसेंबरला दुपारी चार वाजता ग्रेसचा मृतदेह दक्षिण ऑकलंडमधील सिनीक ड्राईव्ह परिसरात आढळला होता. त्याच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी आरोपी जेस केम्पसनला ताब्यात घेऊन हत्येचा खटला सुरु केला होता. जेस बारटेंडर म्हणून काम करत होता. त्याआधी त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची केसही होती.

जेस केम्पसनच्या विनंतीनंतर त्याचं नाव गुप्त ठेवण्याबाबत सुरुवातीला कोर्टाने आदेश दिले होते. मात्र 22 डिसेंबर 2020 रोजी न्यूझीलंडच्या सुप्रीम कोर्टाने त्याचे नाव उघड करण्याची परवानगी दिली. त्याच्यावर बलात्कार, लैंगिक हिंसा, जीवे मारण्याची धमकी असे एकूण नऊ खटले दाखल असल्याचं समोर आलं. (Murder of Grace Millane)

टिंडरवर दोघांची ओळख

टिंडर अॅपवर झालेल्या ओळखीतून ग्रेस आणि जेस यांची भेट झाली. त्यानंतर जेसने तिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तिच्या हत्येनंतर जेसने मृतदेह लपवण्याची पद्धत इंटरनेटवर सर्च केली होती. त्याचप्रमाणे काही पॉर्न फिल्म्सही पाहिल्या होत्या.

जेसशी टिंडरवर ओळख झालेल्या तिघी जणींनी त्याला मॅसोचिस्टिक आणि बाँडेज सेक्स (masochistic and bondage sex) आवडत असल्याचं कोर्टात सांगितलं. या पद्धतीत चोकिंगचाही समावेश होतो. मिलानच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा असल्याचं पोस्टमार्टम अहवालात समोर आलं. त्यामुळे अपघाताने तिचा मृत्यू झाला नाही, तर तिची हत्याच झाल्याचं सिद्ध झालं.

बचावपक्षाचा अजब दावा

जेसतर्फे बचावपक्षाने ग्रेसलाच चोकिंगची आवड असल्याचा दावा केला होता. दोघांमध्ये परस्पर संमतीने सेक्स झाले, मात्र बाँडेज सेक्स करण्याचे अॅडव्हेंचर फसले आणि मिलानचा मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला. तिच्या रक्तात मद्याचे अंशही आढळले होते. अतिमद्यपानही तिचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरल्याकडे बचावपक्षाने लक्ष वेधले.

जेस केम्पसनला 21 फेब्रुवारी 2020 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून किमान 17 वर्ष त्याला पॅरोल मिळणार नाही. निकाल सुनावताना सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असलेल्या ज्युरींपैकी अनेकांना कोर्टातच अश्रू आल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या :

अब्जाधीशाचा तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स ?, मात्र शेवटच्या बायकोकडून विष देऊन खून, कारण काय ?

(Murder of British Backpacker Grace Millane Jesse Kempson claimed she died during choking in consensual sex)

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...