Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा 13 जानेवारी 2019 रोजी उशीने तोंड व गळा दाबून हत्या झाली होती. (Murder of lawyer woman on suspicion of character; Life imprisonment for husband, hard labor for father-in-law)

चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी
चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 10:50 PM

जळगाव : उच्च शिक्षित कुटुंबात घडलेल्या वकिल महिलेच्या हत्याकांडाचा जळगाव न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावला. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या या हत्याकांड प्रकरणी महिलेच्या पतीला जन्मठेप तर सासऱ्याला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. चारित्र्याच्या संशयावरुन हे हत्याकांड घडले होते. न्यायालयाने अवघ्या तीन वर्षात खटल्याची सुनावणी पूर्ण करीत आज अंतिम निकाल दिला. रेखा उर्फ विद्या भरत राजपूत असे मयत वकिल महिलेचे नाव असून पेशाने डॉक्टर असलेला पती भरत पाटील याने तिची हत्या केली. तर सासरा लालसिंग पाटील याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. (Murder of lawyer woman on suspicion of character; Life imprisonment for husband, hard labour for father-in-law)

तीन वर्षांपूर्वी झाली हत्या

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा 13 जानेवारी 2019 रोजी उशीने तोंड व गळा दाबून हत्या झाली होती. भुसावळ येथे मृत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता.भुसावळ) या मूळगाव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता, तेथे विद्या राजपूत यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या. संशयामुळे मृत विद्या यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार दुसर्‍या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता.

14 साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण

यानंतर याप्रकरणी 14 जानेवारी 2019 रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी विद्या राजपूत यांचे पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. जामनेर पोलिसांनी 8 एप्रिल 2019 रोजी जामनेर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. जळगाव जिल्हा न्यायालयात 24 एप्रिल रोजी दोषारोपपत्र वर्ग झाले होते. न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात 19 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी 14 साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. साक्षी, मोबाईल सीडीआर व फॉरेन्सिक अहवाल यानुसार न्या.लाडेकर यांनी आज गुरुवारी निकाल दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. (Murder of lawyer woman on suspicion of character; Life imprisonment for husband, hard labour for father-in-law)

इतर बातम्या

पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल

अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, हत्येची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.